Mahad Chhabina Utsav राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

रायगड: महाडच्या छबिना उत्सवामध्ये अपघात; आकाश पाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी

30 वर्षीय महिला गंभीर जखमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड: महाडमधील छबिना उत्सवामध्ये काल मध्यरात्री अपघात झाला असुन या अपघातामध्ये (Accident) एक महिला गंभीररीत्या जखमी झाली आहे. पल्लवी सुरज कोलणकर (वय 30 वर्ष) रा. निजामपुर तालुका माणगाव असे या जखमी महिलेचे नाव आहे. (Raigad News In Marathi)

छबिना उत्सवात विविध मनोरंजन पाळणे आलेले होते. यामध्ये हाताने फिरवण्यात येणाऱ्या आकाश पाळण्यामध्ये पल्लवी ही महिला बसली होती. पाळणा सुरु झाला तेंव्हा तीचे केस पाळण्यात अडकले आणि डोक्यावरील चामडीसह केस निघुन गेले. या अपघातामध्ये सदर महिला गंभिर जखमी झाली असुन महाडमध्ये (Mahad) प्रथोमोपचार केल्यानंतर अधिक उपचाराकरीता तीला एमजीएम रुग्णालय मुंबई (Mumbai) येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी इंदल दयाराम चौहान राहणार उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) याच्या विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Raigad News Updates)

हे देखील पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT