पत्नीला परीक्षेला सोडलं अन् काळानं गाठलं; दोन दुचाकींच्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू !

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील विचित्र अपघातात (Accident) दोघे जण जागीच ठार झाले आहेत. वेगाने धावणाऱ्या दोन दुचाकी परस्परांवर एवढ्या जोरात आदळल्या अन् दोघांना जागीच प्राण गमवावे लागले.
पत्नीला परीक्षेला सोडलं अन् काळानं गाठलं; दोन दुचाकीच्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू !
पत्नीला परीक्षेला सोडलं अन् काळानं गाठलं; दोन दुचाकीच्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू !अविनाश कानडजे
Published On

अविनाश कानडजे

औरंगाबादः जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील विचित्र अपघातात (Accident) दोघे जण जागीच ठार झाले आहेत. वेगाने धावणाऱ्या दोन दुचाकी परस्परांवर एवढ्या जोरात आदळल्या अन् दोघांना जागीच प्राण गमवावे लागले. औरंगाबादच्या पैठण पाचोड रस्त्यावर डाव्या कालव्याजवळ ही घटना घडली आहे. माहितीनुसार, यातील एक तरुण आपल्या पत्नीला बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सोडून परत निघाला होता. तर दुसरा नातेवाईकांच्या घरी कुंकवाच्या कार्यक्रमावरून गावी परतत होता. या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पत्नीला परीक्षेला सोडलं अन् काळानं गाठलं; दोन दुचाकीच्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू !
ATMमध्ये रोकड भरणाऱ्यांनीच केला लाखोंचा अपहार; बुलढाण्यात खळबळजनक प्रकार!

दुचाकींचा चक्काचूर;

पैठण- पाचोड रस्त्यावर झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. गोन्ही गाड्या भरधाव वेगात होत्या. यामुळे गाड्या एकमेकांवर आदळताच गाडीवरील नितीन साबळे हे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतात सुमारे अडीचशे ते तीनशे फूट लांब जाऊन पडले होते. तर अपघातातील दुसरे जखमी खूप वेगाने जाऊन झाडावर लकटले होते. तर, आणखी एक जण जागीच मृत्यू झाला होता.या अपघाताची नोंद पैठण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच फौजदार सतीश भोसले, रामकृष्ण सागडे, सुधाकर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अनिरुद्ध शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत त्यांना त्वरित शासकीय रुग्णालयात हलवले. तर जखमीला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात (Ghati Hospital Aurangabad) हलवण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com