Rahuri bypoll candidates list : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतलेले राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आता अप्रत्यक्षपणे भाजपा सोबतच आहेत, असे खळबळजनक वक्तव्य सुजय विखे यांनी केले आहे. भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तनपुरेंनी हे वृत्त फेटाळून लावले होते. पण आता विखेंच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
सुजय विखे म्हणाले की, "पूर्वी माझ्या कारखान्याची ऊसतोड एखाद्या शेतात गेली, तर ती तनपुरे गटाची की विखे गटाची, अशी चर्चा व्हायची. मात्र, आता मी सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळली आहे. कोणत्याही बांधावर गेलात तरी आता फक्त 'कमळ'च दिसेल." स्वतःचा त्रास कमी करण्यासाठीच आपण ही व्यूहरचना केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पूर्वी 'कमळा'साठी फक्त एका 'दादा'ला (सुजय दादा) धावपळ करावी लागायची. आता मात्र अक्षय दादा, प्राजक्त दादा आणि सुजय दादा असे तीन-तीन दादा एकत्र आले आहेत," असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले. काही कार्यकर्त्यांनी इतर नेत्यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारणा केली असता, विखे म्हणाले की, "आता कोणाला एकट्याला पक्षात घ्यायचे नाही, तर सर्वांना 'पॅकेज' स्वरूपात सोबत घ्यायचे आहे. या विधानातून त्यांनी प्राजक्त तनपुरे यांच्यासह त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याचे संकेत दिले आहेत.
राहुरीत अपक्ष उमेदवाराचा सायकलवर प्रचार.. सुजय विखेंचीही घेतली भेट
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार महेश हापसे यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.. विशेष म्हणजे, प्रचारादरम्यान त्यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.. महेश हापसे यांचा प्रचार सध्या वेगळ्याच पद्धतीने सुरू असून ते सायकलवरून गावोगावी फिरत मतदारांशी संपर्क साधत आहेत.. वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर खर्च वाचवण्यासाठी आणि जनतेशी थेट जोडले जाण्यासाठी सायकलचा वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले.. दरम्यान, प्राजक्ता तनपुरे यांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे हापसे यांनी स्पष्ट केले.. तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तरुण नेतृत्वाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.. लोणी आणि बारामती येथील विकास पाहिल्यानंतर राहुरीतही तशाच प्रगतीची गरज असल्याची भावना व्यक्त करत, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठीच आपण निवडणूक लढवत असल्याचा विश्वास हापसे यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.