Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe-Patil : राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारखान्याच्या चौकशीचे आदेश; नेमकं कारण काय?

Ahmednagar News : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील एका साखर कारखान्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

Shivani Tichkule

सचिन बनसोडे

Maharashtra Politics : महसूलमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. सुजय विखे यांच्याशी संबंधित साखर कारखान्याची चौकशी करण्याचे आदेश राहाता न्यायालयाने दिले असल्याची माहिती प्रवरा शेतकरी मंडळाचे अरुण कडू यांनी दिली आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कर्जमाफीचे हे प्रकरण असून अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेत कडू यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढे काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

२००४ साली शेतकऱ्यांच्या (Farmer) बेसल डोसच्या नावाखाली विखे पाटील (Radhakrisha Vikhe Patil) सहकारी साखर कारखान्याने बँकांकडून जवळपास ६ कोटींचे कर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत झाल्याने कर्जाची रक्कम २००९ पर्यंत व्याजासह साडेनऊ कोटींच्या पुढे गेली.

शासनाच्या कृषी कर्जमाफी योजना आल्यानंतर कारखान्याच्या सांगण्यावरून बँकांनी शासनाकडे कर्जमाफी प्रकरणे दाखल करून कर्जमाफी मिळवली. मात्र पुढे शासनाच्या लक्षात येताच बँकांना ही रक्कम शासनाला परत द्यावी लागली. मात्र कर्ज आणि व्याजाचा बोजा सभासदांच्या माथी आल्याचा दावा अरुण कडू यांनी केला आहे.

शेतकरी मंडळाच्या वतीने २०११ पासून या संबंधी उच्च न्यायालयात पाठपुरावा सुरू आहे. तर कारखान्याने देखील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिर्डीच्या तत्कालीन पोलीस उपाधीक्षकांच्या अंतिम पोलीस रिपोर्टच्या आधारे न्यायालयाने कारखान्याच्या बाजूने याचिका निकाली काढली होती.

मात्र पोलीस रिपोर्ट मान्य नसल्यास याचिकाकर्त्यांना पुन्हा दाद मागण्याची तरतूद ठेवली होती. त्यानुसार याचिकाकर्ते दादासाहेब पवार आणि बाळासाहेब केरु विखे यांनी राहाता न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायालयाने निकाल देत विखे कारखान्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Infinix Hot 60i: दमदार बॅटरी, AI फीचर्ससह Infinix Hot 60i स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये जाणून घ्या

Ahilyanagar Fire : अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री भीषण आग, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Sambhajinagar Accident : संभाजीनगरात मध्यरात्री अपघाताचा थरार, मद्यधुंद कारचालकाने ६ जणांना उडवले, ३ वाहनांचा चेंदामेंदा

Somwar che Upay: सोमवारी रूद्राक्षाचे करा 'हे' उपाय; यशाच्या शिखरावर पोहोचायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT