lonand, ashadhi ekadashi 2023,  saam tv
महाराष्ट्र

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023 : लोणंद पालखीतळ : वारक-यांच्या दिंड्यांबाबत महसूलमंत्र्याची सक्त सूचना

ashadhi ekadashi 2023 : नवनिर्वाचित जिल्हाधिका-यांनी दिली नियाेजनाची माहिती.

Siddharth Latkar

Satara News : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (sant dnyaneshwar maharaj palkhi sohala 2023) येत्या 18 जूनपासून 23 जूनपर्यंत सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होणार असून या कालावधीत जिल्हा प्रशासनाने वारकरी (warkari) व भाविकांना (devotees) आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश आज (गुरुवार) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांनी प्रशासनास दिले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणंद पालखी तळ (lonand palkhi) व फलटण पालखी (phaltan palkhi) तळाची वारीच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. (Maharashtra News)

पालखी मुक्कामस्थळाच्या पाहणीवेळी विखे पाटील म्हणाले संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मुख्य पालखीच्या सोबत नोंदणीकृत दिंड्या असाव्यात व त्यानंतर नोंदणी नाहीत अशा इतर दिंड्यांचा समावेश करावा म्हणजे प्रशासनाला सोयी सुविधांचे नियोजन करताना सोयीचे होईल.

भाविकांना पालखी सोहळ्याच्या कालावधीत कुठलाही त्रास होणार नाही याची जिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी. पालखी सोहळ्याच्या ठिकाणची पाहणी केली असता सोहळ्याचे नियोजन जवळपास पूर्ण होत आलेले आहे. लोणंद पालखी तळावरील विद्युतवाहक तारांमुळे वारकरी व भाविकांना त्रास होणार नाही यासाठी या विद्युतवाहक तारा पालखी तळापासून दूर उभाराव्यात, अशा सूचनाही विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

नवनिर्वाचित जिल्हाधिका-यांनी दिली नियाेजनाची माहिती

लोणंद पालखीतळ येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी पालखी सोहळ्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली.

यावेळी आमदार जयकुमार गोरे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, पालखी सोहळा प्रमुख आणि विशस्त तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT