Sanjay Raut on Radhakrishna Vikhe Patil saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut on Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं - संजय राऊत

Sanjay Raut Latest News : तुमच्या मनात कोणी असेल आणि तुम्ही नांदत दुसऱ्याबरोबर असाल तर हा व्यभिचार आहे, अशी टीका राऊत यांनी विखे पाटलांवर केली आहे.

संजय महाजन

Sanjay Raut on Radhakrishna Vikhe Patil : भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला आहे. तुमच्या मनात कोणी असेल आणि तुम्ही नांदत दुसऱ्याबरोबर असाल तर हा व्यभिचार आहे, अशी टीका राऊत यांनी विखे पाटलांवर केली आहे.

संजय राऊत म्हणाले, लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्या बरोबर हा व्यभिचार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांनी त्यांनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. त्यांच्या मनात दुसरे मुख्यमंत्री असतील तर त्यांनी त्यांना बसवावा आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपती बसवा असही संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी हल्ले-प्रतिहल्ले

जळगावच्या पाचोरामध्ये आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर जळगावातील राजकारण चांगलंच तापलं असून राजकीय हल्ले-प्रतिहल्ले केले जात आहे. ठाकरे गट आणि शिवसेनेकडून एकमेकांवर जोरदार टीका जोरदार केली जात आहे.

ते दगडच निघाले, गुलाबराव पाटलांना टोला

गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, सुवर्णनगरीतले काही दगड आमच्यासोबत होते. मात्र ते दगडच निघाले. पालकमंत्री कोरोना काळात लोकांचे प्राण जात असताना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी ४०० कोटी रुपयाचा घोटाळा केला. त्याची कागदपत्र माझ्याजवळ आहे, असे संजय राऊत म्हणाले. विधानसभेत आणि विधान परिषदेत याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले, मात्र प्रकरण दाबण्यात आले असा आरोपही राऊत यांनी केला. (Latest Political News)

सरकारचं डेथ वॉरंट तयार

राज्यातील शिवसेना आणि भाजप युती सरकारविषयी बोलताना राऊत म्हणाले, संपूर्म सरकारच भ्रष्ट आहे. पुढच्या १५ दिवसात हे सरकार कोसळेल. सरकारचं डेथ वॉरंट तयार आहे, त्यावर सई व्हायची बाकी आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी युतीतील सरकारवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

SCROLL FOR NEXT