radhakrishna vikhe patil , balasaheb thorat, shirdi saam tv
महाराष्ट्र

Shirdi : मंत्री असताना बाळासाहेब थोरात संगमनेर पलिकडे गेलेच नाहीत : राधाकृष्ण विखे पाटील

पंकजा ताई या नाराज नाहीत. त्यांनी मला कालच शुभेच्छा दिल्या असं राधाकृष्ण विखे पाटलांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

- माेबीन खान

radhakrishna vikhe patil : स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवा वर्षा निमित्त हर घर तिरंगा, हर मन तिरंगा असा उत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या कल्पकतेमुळे देशभरात सध्या जल्लाेषाचे वातावरण आहे. राज्यातील जनतेच्या अपेक्षा पुर्ण शिंदे-फडणवीस सरकार निश्चित प्रयत्न करेल असं मत मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी (shirdi) येथे व्यक्त केले.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी येथे साई बाबा यांचे दर्शन घेण्यासाठी आले हाेते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील यांनी सध्याच्या सरकारनं केलेले काम आणि मविआनं केलेल्या भ्रष्टाचाराबाबत त्यांचं मत विविध प्रश्नांवर उत्तर देताना मांडलं.

राज्यात जनतेच्या मताचं सरकार आलेले आहे. राज्यातील जनतेचे प्रश्न साेडविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारवर कटीबद्ध आहे. आज साई बाबांच्या चरणी आमच्याकडून जास्ती जास्त जनतेची सेवा व्हावी अशी मागणी केल्याचेही राधाकृष्ण पाटील यांनी नमूद केले.

आता त्यांचे सरकार गेलं आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यांच्याकडं लक्ष देण्याची गरज नाही असं एका प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटलांनी उत्तर दिलं. ते म्हणाले विश्वासघाताने मविआ सरकार स्थापन झालं याचा विसर जयंत पाटलांना पडलेला असावा. भाजप आणि मोदींच्या नेतृत्वात शिवसेनेने युती केली होती. त्यात शिवसेनेने पाठीत खंजरी खुपसला. कॉग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेचे सरकार विश्वासघातानं आलं असा पुर्नउच्चार विखे पाटलांनी केला.

मविआ सरकार आल्यानंतर बाळासाहेब थाेरात यांनी विखे पाटील हे गावचे नेते झालेत अशी टीका केली हाेती. त्यावर आज विखे पाटलांना माध्यमांनी छेडले असता त्यांनी बाळासाहेब थोरात यांनी मंत्री असताना त्यांनी संगमनेर पलिकडे काही पाहिल नाही. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. सत्ता गेल्यानंतर आता त्यांना गाव, माणसं आठवतेय हे पाहून बरं वाटतय असा टाेला विखे पाटलांनी थाेरातांना लगावला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies: काळेभोर आणि दाट केसांसाठी एकदा ट्राय करा 'हे' उपाय

Onion Crop : धुक्यामुळे कांदा पिक धोक्यात; रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल

VBA News : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात | Video

Sneeze: शिंकताना डोळे का बंद होतात? जाणून घ्या एका क्लिकवर

Crime News : ३-३ गर्लफ्रेंड, महागडं गिफ्ट द्यायचं होतं; पठ्ठ्या थेट बँक लुटायला गेला, पण सगळा घोळ झाला!

SCROLL FOR NEXT