Violence erupts at Radha Patil’s dance program in Pandharpur, event halted midway. saam tv
महाराष्ट्र

Radha Patil: राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान हाणामारी; प्रेक्षकांनी एकमेकांना मारल्या लाथा-बुक्क्या, गोंधळ उडताच शो सोडला

Chaos at Radha Patil Show: पंढरपूरमध्ये येल्लम्मा यात्रेनिमित्त राधा पाटील यांचा डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाली.

Bharat Jadhav

  • पंढरपूरच्या सुस्ते गावात कार्यक्रमादरम्यान हाणामारी

  • किरकोळ वादातून मोठा राडा

  • राधा पाटील यांचा कार्यक्रम अर्धवट बंद

नृत्यंगना राधा पाटील यांचा पंढरपूरच्या सुस्ते गावात सुरू असलेल्या कार्यक्रमात तुफान राडा झाला. कार्यक्रम बघायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यल्लमादेवीच्या यात्रेच्या निमित्ताने राधा पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राधा पाटील यांचा डान्स पाहण्यासाठी आलेल्या तरुणांनी हुल्लडबाजी केली. डान्स पाहताना झालेल्या किरकोळ वादातून तरुणाला बेदम मारहाण झाली.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला ज्या पद्धतीने गर्दी असतेच त्याचपद्धतीने राधा पाटीलच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी गर्दी केली होती. डान्सचा कार्यक्रम ऐनरंगात आल्यानंतर प्रेक्षकांच्यामधील हाणामारी सुरु झाली. किरकोळ कारणावरुन सुरु झालेला वादाचं हाणामारीत रुपांतर झालं. धक्काबुकी, आरडाओरडा, शिवराळ भाषा येऊ लागली. त्यानंतर हा राडा आणखीनंच वाढत गेला आणि गोंधळ वाढला. त्यानंतर राधा पाटीलचा कार्यक्रम बंद करण्यात आला. 

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात यात्रा भरली आहे, यात नर्तकी राधा पाटील हिचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी गौतमी पाटील हिचाही कार्यक्रम जत्रेच्या काळात घेण्यात आला. मात्र तुफानी गर्दी होऊनही हा कार्यक्रम शांततेत पार पडला.

सुस्ते गावात दोन राजकीय पक्षांचे दोन गट आहेत. यातील एका राजकीय पार्टीनं गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर दुसऱ्या राजकीय पार्टीनं राधा पाटील हिचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्याचदरम्यान वाद झाला. गौतमी पाटील आणि राधा पाटील यांच्यात काही स्पर्धा असल्याचं दिसून येते. त्यांची ही स्पर्धा प्रेक्षकांमध्येही जाणवते. दरम्यान कार्यक्रमातील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक ग्रुप एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : निवडणुकीआधीच महायुतीने ६ जागा जिंकल्या, ११ जागांसाठी आज मतदान; साताऱ्यापासून ते नागपूरपर्यंत नगरसेवक बजावणार हक्क

Operation Tiger : 'ऑपरेशन टायगर' लांबणीवर! या २ कारणांमुळे ६ खासदारांचा १९ जूनचा मुहूर्त हुकणार; एकनाथ शिंदेंची सावध पावले

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार

डीलिमिटेशन बिलाच्या मंजुरीसाठी ठाकरेसेना फोडली? 2029च्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती?

अचानक धनलाभ होईल,खिशात पैसा खेळता राहील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या गोष्टी घडतील

SCROLL FOR NEXT