मेंढपाळांच्या वाड्यांवर रक्तदान शिबिर. 
महाराष्ट्र

अमरावतीत रक्तदानासाठी मेंढपाळांच्या रांगा

अरूण जोशी

अमरावती : सामान्यपणे सुशिक्षित वर्गाला रक्तदान करण्याचे आवाहन केल्यानंतरही काही अपवाद वगळता कुणीही फारसे समोर येत नाहीत,असा आजवरचा अनुभव आहे. मात्र जंगल, डोंगरांमध्ये खांद्यावर घोंगडे आणि हाती काठी घेऊन शेळ्या मेंढ्या चारणाऱ्या धनगर, मेंढपाळ बांधवांना रक्तदानाचे महत्व कळलंय. आज अमरावती जिल्ह्यात रक्तदानाचा एक आगळा वेगळा उपक्रम मेंढपाळांनी राबविला. हा खरे तर समाजासमोर एक नवा आदर्शच आहे.

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा रक्तदान महायज्ञ आहे. मेंढपाळ धनगर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष महात्मे यांच्या पुढाकारातून हे रक्तदान शिबिर राबविण्यात आले. Queues of shepherds for blood donation in Amravati

मातोश्री वृद्धाश्रमाच्या माळेगाव (भानखेडा)जवळ असलेल्या मेंढपाळ धनगरवाड्यात हा उपक्रम पार पडला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. आज पहिल्यांदा वनात त्यांच्या राहुटीमध्ये मेंढपाळ महिला-पुरुष रक्तदान करुन राष्ट्रीय कार्याची जाणीव आधुनिक जगाला करुन दिली.

खरेतर पवार घराण्यासोबत धनगर समाजाचे नाते कौटुंबिक राहिले आहे. मेंढपाळ धनगरवाड्यात हा उपक्रम पाहून अनेकांना आनंद झाला. सकाळपासून परिसरात आनंदाचे वातावरण होते. या शिबिरातून राज्यात रक्तदानाबाबत जागृतीचा संदेश जावा, हाच यामागील प्रमुख उद्देश होता. या रक्तदान शिबिरात आजूबाजूच्या वाड्यावरचे धनगर बांधवही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पाहुण्यांचे स्वागत धनगर समाजाच्या पारंपारिक वाद्यांनी करण्यात आले, तर यावेळी समाजाच्या महिला, युवक यांनी आकर्षक नृत्यही यावेळी केले.

जवळपास २०० मेंढपाळ बांधवांनी आयोजित रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी वाड्यावरच्या मेंढपाळांना कोरोना विषाणूबाबत माहिती दिली. या सोबतच त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याचे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले. जंगलात राहूनही रक्तदानात कमी नाहीत, हे मेंढपाळांनी दाखवून दिले. शासनाच्या सर्व योजना आम्ही या लोकांपर्यंत पोहचवू.Queues of shepherds for blood donation in Amravati

- सुरेखा ठाकरे, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद.

वाड्यावरील सर्व मेंढपाळांना कोरोनापासून बचावासाठी मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर व टॉर्चचे वाटप करण्यात आले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. मेंढपाळ धनगरांच्या वाड्यावर अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेला हा अनोखा उपक्रम नक्कीच समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारा आहे.

- संतोष महात्मे, राष्ट्रवादी काँग्रेस.

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT