शेकाप नेते जयंत पाटलांच्या एस.जे. शुगर कारखान्याची साखर सील

 

Saam Tv

महाराष्ट्र

शेकाप नेते जयंत पाटलांच्या एस.जे. शुगर कारखान्याची साखर सील

रावळगावमधील एस.जे. शुगर कारखान्याची तब्बल 24 कोटी रुपयांची साखर सील करण्यात आली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक - शेकाप नेते जयंत पाटील यांच्या रावळगावमधील एस.जे. शुगर कारखान्याची तब्बल 24 कोटी रुपयांची साखर सील करण्यात आली आहे. 2020-21 च्या गळीत हंगामामधील एफआरपीपोटी 17 कोटी 98 लाख 76 हजार रुपये थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई केली आहे.यात 23 कोटी 71 लाख रुपयांची साखर, 35 लाखांची कच्ची साखर, मोलॅसेस आणि बॅग असा एकूण 24 कोटी 82 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज सील करून ताब्यात घेण्यात आला आहे.

हे देखील पहा -

साखर कारखान्यांच्या ऊस नियंत्रण आदेशान्वये 1966 च्या कलम 3 मधील तरतुदीनुसार हंगामामधील गाळप केलेल्या उसाचे 14 दिवसांत किमान एफआरपीप्रमाणे ऊस पुरवठादारांना पैसे अदा करणे बंधनकारक असताना, एस. जे. शुगरने ऊस पुरवठादारांची रक्कम थकवली आहे. याबाबत साखर संचालनालयाने कारखान्याला नोटीस दिली होती. थकीत एफआरपी प्रमाणे 19 मे ला सुनावणीही झाली होती. त्यानंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या आदेशानुसार जप्तीची कारवाई करण्यात आली. साखर आयुक्तालयाने ही कारवाई केल्यानंतर जप्त झालेल्या ऐवजचा लिलाव होऊ शकतो. यामुळे ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या थकीत रक्कम मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT