Pune–Sambhajinagar Expressway Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Pune–Sambhajinagar Expressway : पुणे-संभाजीनगर फक्त ३ तासांत, 10 लेनचा एक्सप्रेसवे होणार, पहिल्या टप्प्याचे काम झाले सुरू

Pune to Aurangabad new highway travel time 3 hours : पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. दहा लेनचा हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते संभाजीनगर प्रवास फक्त ३ तासात होणार असून मराठवाड्याच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

Pune Sambhajinagar Expressway Latest Update : पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांना जोडण्यासाठी नवा महामार्ग तयार करण्यात येत आहे. हा महामार्ग तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर फक्त ३ तासात पूर्ण होईल, असा दावा केला जातोय. सध्या या मार्गावर ८ ते १० तासांचा वेळ लागतोय. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात MSIDC कडून पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाबाबत माहिती देण्यात आली आहे.

पुणे ते छत्रपती संभाजीनगर या एक्सप्रेसवेवर MSIDC वेगाने काम करत आहे. महामार्ग तयार झाल्यास मराठवाड्याच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील प्रवास जलद होईलच. रिपोर्ट्सनुसार, पुणे-संभाजीनगर एक्सप्रेसवेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. दहा लेनवरून गाड्या धावणार असल्याचेही समजतेय. संभाजीनगरहून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नोकरी, व्यापार, शिक्षणासाठी पुण्याला पसंती दिली जाते. त्यामुळे संभाजीनगर आणि पुणे ही दोन शहरे जोडण्याचा निर्णय घेतलाय.

पुणे ते संभाजीनगर एक्सप्रेस वे ३ टप्प्या पूर्ण होणार आहे. यातील पहिला टप्पा महत्त्वाचा आहे. त्या टप्प्यासाठी आर्थिक निविदा नुकतीच जारी करण्यात आली आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर बांधकाम सुरू होऊ शकते. महामार्ग तयार झाल्यानंतर पुणे ते संभाजीनगर हा प्रवास फक्त ३ तासात पूर्ण होईल, सध्या या प्रवासासाठी आठ ते १० तास लागतात. या महत्वाकांक्षी प्रकल्पात पुणे ते शिरूर उन्नत मार्गासह शिरूर ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत नवीन सहा पदरी ग्रीनफिल्ड महामार्गाचाही समावेश असेल. त्यामुळेच दोन शहरातील प्रवास अधिकच वाचणार आहेच. त्याशिवाय मराठवाड्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही मोठं बळ मिळेल. तसेच या प्रकल्पामुळे व्यापार, पर्यटन आणि दळणवळणही वेगात होईल, असे म्हटले जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tara Sutaria-Veer Pahariya Breakup: तारा सुतारिया-वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? गायकाला किस करणं पडलं महागात

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

Valentine Day Love Letter: 'प्रेम हे फक्त प्रेम असतं, पहिलं-दुसरं असं काही नसतं'

Today Panchang: आजचे पंचांग आणि राशीसंकेत: शुक्रवार कोणासाठी ठरणार फायदेशीर?

SCROLL FOR NEXT