Pune Nanded Vande Bharat Express launch date Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Vande Bharat Express : नांदेडमधून आणखी एक वंदे भारत, पुण्याला फक्त ७ तासात; कुठे कुठे थांबणार, तिकिट किती? वाचा A टू Z माहिती

Pune-Nanded Vande Bharat express Update News: पुणे–नांदेड वंदे भारत एक्सप्रेस डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान सुरू होणार आहे. नांदेड–लातूर–धाराशिव–कुर्डूवाडी–दौंड मार्गे ही गाडी फक्त 7 तासांत पुण्यापर्यंत पोहोचेल. अंदाजे तिकिट दर ₹1500–₹1900.

Namdeo Kumbhar

Pune Nanded Vande Bharat train stoppages and ticket fare : पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. डिसेंबरमध्ये नांदेड ते पुणे या मार्गावर वंदे भारत धावणार आहे. नांदेडमधून धावणारी ही दुसरी वंदे भारत एक्सप्रेस असेल. याआधी मुंबई ते संभाजीनगर या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आला होता. आता पुणे आणि नांदेड या दोन शहराच्या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. याबाबतचे काम अंतिम टप्प्यात आहे. नांदेड ते पुणे ५५० किमी अंतर नवीन सेमी-हाय-स्पीड ट्रेन फक्त सात तासात पूर्ण करेल, असा अंदाज वर्तवलाय जातोय. नांदेडहून पुण्याला येणाऱ्यांसाठी ही गाडी महत्त्वाची ठरणार आहे. नांदेड-पुणे ही वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या स्थानकावर थांबणार? तिकिट किती असणार? यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात... (Pune–Nanded Vande Bharat Route Finalized: Stops, Travel Time & Ticket Details)

पुणे नांदेड वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार? Pune to Nanded Vande Bharat expected launch date

नांदेड आणि पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस डिसेंबर २०२५ अथवा जानेवारी २०२६ मध्ये धावण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. नांदेंड-पुणे या दोन शहरादरम्यान वंदे भारत एक्सप्रेसद्वारे अधिक सोयीस्कर आणि जलद प्रवास होणार आहे. दोन शहरांमधील असणारे ५०० किमी अंतर सात तासांत पूर्ण होईल.

नांदेड-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा काय? Railway development for Pune and Marathwada

नांदेड, लातूर, धाराशिवमधून पुण्याला शिकण्यासाठी, कामासाठी ये-जा करणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच या मार्गावर मर्यादीत रेल्वे धावतात. त्यामुळे लोकांना रस्ते मार्गेच पुण्याला जावे लागते. या प्रवासामुळे वेळ तर जातोच, त्याशिवाय जास्त पैसेही मोजावे लागत आहेत. नांदेड-पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणखी जवळ येईलच. त्याशिवाय रोजगार, पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.

नांदेड-पुणे वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या स्थानकावर थांबणार ? Semi high speed train in Maharashtra new route

नांदेड-पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून पाच ते सहा दिवस धावण्याची शक्यता आहे. या वंदे भारतला नांदेड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद), कुर्डूवाडी, दौंड आणि पुणे या स्थानकावर थांबे असतील. पुणे ते नांदेड या मार्गावर रस्त्याने जाण्यास ५०० किमी प्रवास करण्यासाठी १० ते १२ तास लागतात. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास हा प्रवास सात तासांवर येणार आहे.

नांदेड-पुणे वंदे भारत एक्सप्रेस तिकिट किती असेल ? Pune Nanded Vande Bharat train stoppages and ticket fare

नांदेड-पुणे वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या वेळेला धावणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या मार्गावरील अंदाजे तिकिटाचे दर समोर आले आहेत. एसी चेअर कारचे तिकिट १५०० ते १९०० रुपये इतके असू शकते. अद्याप रेल्वेकडून अधिकृत तिकिट सांगण्यात आलेले नाही. नांदेड-पुणे या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. How much will Pune Nanded Vande Bharat ticket cost?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tandalachi Kheer Recipe : गोड खाण्याची इच्छा होतेय? फक्त १० मिनिटांत बनवा तांदळाची खीर

Gayatri Datar Photos: गायत्री दातारचं सौंदर्य, पाहताच जीव दंगला, रंगला...

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्यासोबत उठणं बसणं सुरुच राहणार - राज ठाकरे

Rohit Arya Encounter: रोहित आर्यचा एन्काऊंटर कोणी केला?

Rohit Arya:'शिक्षणमंत्र्यांनी' 2 कोटी थकवल्याचा आरोप; रोहित आर्य प्रकरणात दीपक केसरकर काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT