PUNE UNIVERSITY EXAM CANCELLED saam tv
महाराष्ट्र

पुणे विद्यापिठाच्या सर्व परीक्षा रद्द! आता 'या' तारखेला होणार पेपर

Pune University October 31 Exam Cancelled Latest Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि नाशिकमधील विद्यार्थ्यांचे पेपर आता ११ नोव्हेंबर रोजी पूर्वनियोजित वेळेनुसार होणार आहेत.

Omkar Sonawane

सचिन जाधव, साम टीव्ही

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विद्यापीठाने ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. नाशिकमध्ये राष्ट्रपतींचा दौरा आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच वाहतूक कोंडी निर्माण होण्याची चिन्हे असल्याने नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याबाबत विद्यापीठाला कळवले होते.

या परिस्थितीचा विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ३१ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेल्या सर्व विषयांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी परिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, रद्द करण्यात आलेल्या सर्व परीक्षा आता ११ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या परीक्षांसाठी वेळापत्रकात पूर्वनियोजित असलेली वेळच कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुधारित तारखेनुसार परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Organza Sarees Designs For Women: महिलांसाठी ऑरगॅन्झा साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन: 5 लेटेस्ट पॅटर्न दिवाळीसाठी नक्की निवडा

Maharashtra News Live Update: Mumbai: रेल्वे स्थानकांवर तरुणाचे धोकादायक स्टंट

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार यांचं निधन; मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; राजकीय वर्तुळात शोककळा

पाणी पिण्याच्या बहाण्याने सख्खा पुतण्या काकूच्या घरात शिरला अन् 80 वर्षीय महिलेसोबत घडलं भयंकर!

Blood Donation Benefits: रक्तदान केल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

SCROLL FOR NEXT