सागर आव्हाड, साम टिव्ही
पुणे : पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणाने महाराष्ट्र हादरलं आहे. या प्रकरातील आरोपी दत्तात्रय गाडेला रात्री उशिरा अटक केली. शिरुरमधील गुनाट गावातून आरोपी दत्तात्रय गाडेला अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर आज शुक्रवारी सांयकाळी सहा वाजतापुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं. त्यानंतर ८ क्रमांकाच्या कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने आरोपी दत्तात्रय गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सरकारी वकील काय म्हणाले
सरकारी वकील काय म्हणाले, आरोपीवर दाखल असलेल्या ६ गुन्ह्यांपैकी ५ गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत. त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होतं. या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपचा आहे. आरोपी सराईत असल्याने त्याने यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेले आहे का हे तपासायचे आहे. त्याचबरोबर आरोपीला मदत करणारे आणखी काहीजण त्याच्यासोबत आहेत का हे तपासायचे आहे. सखोल तपासासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे. सरकारी वकिलांनीही याआधी गुन्ह्याची आणि आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. आतापर्यंत या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे तसेच आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी मांडला.
आरोपी दत्ता गाडेचे वकील म्हणाले, दत्ता गाडे याचा चेहरा टीव्हीवर दाखवला गेला. पोलिसांनी सोशल मीडिया ट्रायल केलं. या घटनेत मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली होती. हा एवढा गंभीर गुन्हा नाही. पीडितेवर कुठलाही अत्याचार झालेला नाही. दोघांमध्ये सहमतीने संबंध झाले आहेत. आरोपी दत्तात्रय गाडे याच्या जीविताला धोका आहे. दत्ता गाडे याचा भाऊ त्याच्यासारखाच दिसतो पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलं आहे. असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.