Pune Swargate Case : नराधम गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात काय युक्तिवाद झाला? वाचा

Pune Swargate Case update : नराधम दत्तात्रय गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने नराधम गाडेला १२ दिवसांची कोठडी सुनावणी आहे .
Pune Swargate Case update
Pune Swargate Case Saam tv
Published On

पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणाने महाराष्ट्र हादरलं आहे. या प्रकरातील आरोपी दत्तात्रय गाडेला रात्री उशिरा अटक केली. शिरुरमधील गुनाट गावातून आरोपी दत्तात्रय गाडेला अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर आज शुक्रवारी सांयकाळी सहा वाजतापुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं. त्यानंतर ८ क्रमांकाच्या कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने आरोपी दत्तात्रय गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेचा थरार रात्री उशिरापर्यंत सुरु होता. दत्तात्रय गाडेने पीडित तरुणीवर अत्याचार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता. अत्याचारानंतर गेल्या काही दिवसांपासून दत्तात्रय गाडे हा शिरुरमधील गुनाट गावात लपून बसला होता. गुनाट गावातील ऊसाच्या वावरात गाडे लपला होता. आरोपी गाडेने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, त्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक करत आज शुक्रवारी गाडेला कोर्टात हजर केलं.

आरोपी दत्तात्रय गाडे याचे वकीलपत्र वकील साजिद शाह, वाजिद खान यांनी घेतलं आहे. आरोपी गाडेला कोर्टात घेऊन जाण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आज शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आरोपीला कोर्टासमोर हजर करण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर पुढील सुनावणीसाठी आरोपीला ॲानलाईन/ व्हीसीद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी पोलिसांनी मागितली.

आज शुक्रवारी कोर्टात हजर केल्यानंतर पोलिसांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. आरोपी दत्तात्रय गाडेवर एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. पाच गुन्ह्यांत ६ महिला तक्रारदार आहेत. आरोपीच्या वकिलांकडून २ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, कोर्टाने आरोपी गाडेला १२ मार्चंपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या बाजूनं युक्तिवाद करताना वकिलांनी म्हटलं, आरोपीचा चेहरा माध्यमांवर दाखवला गेला. पोलिसांनी सोशल मीडिया ट्रायल केलं. एवढा गंभीर गुन्हा नाही. मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली. कुठलाही अत्याचार झाला नाही. दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com