Police gives update on accused Dattatray Gade  Saam Tv News
महाराष्ट्र

Dattatray Gade : स्वारगेट अत्याचार घटना; आरोपी ४८ तासांपासून मोकाट, पोलिसांकडून महत्त्वाची अपडेट...

Pune Swargate Depot Rape Case : स्वारगेट डेपोत घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचं समोर आलं आहे.

Prashant Patil

पुणे : रात्रंदिवस प्रवाशांची गर्दी असलेल्या पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणानं राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. मागील ४८ तासांपासून आरोपी हा फरार असून या प्रकरणी पोलिसांनी एक महत्त्वाची अपडेट दिलीय.

स्वारगेट डेपोत घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचं समोर आलं आहे. दत्तात्रय हा राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असल्याचं देखील समोर आलं आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तो प्रचारात सहभागी झाल्याचं कळलं आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, आरोपी हा राजकीय व्यक्ती, पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्या अनुषंगानेही चौकशी सुरू केली आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा १३ पथकांकडून शोध घेण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी दिली. रेल्वे स्टेशन, बस स्टँड या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोपी गाडेच्या कुटुंबातील काही सदस्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shah Rukh Khan Bodyguard : सलमानच्या शेरानंतर शाहरूखचा बॉडीगार्ड चित्रपटात, कोणती भूमिका साकारणार?

Sandhan Valley : सप्टेंबरमध्ये घ्या अविस्मरणीय अनुभव; मुंबई-नाशिकहून सांधण व्हॅलीला पोहोचण्याची संपूर्ण माहिती

PF Withdrawal: आता काही मिनिटांत काढता येणार PF खात्यातून १ लाख रुपये; सोपी आहे प्रोसेस; वाचा सविस्तर

Gen Z Leads Protests: तरुण पिढीनं सरकारविरोधात आंदोलन का केलं? नेपाळमधील असंतोष का वाढला?

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

SCROLL FOR NEXT