Pune Saam Tv News
महाराष्ट्र

Pune News: आजच्या आजच कारवाईचा अहवाल पाहिजे, पुणे घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर; पोलिसांना सूचना

Pune ST Depot Crime Ajit Pawar: पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमधील २६ वर्षीय तरूणीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमधील २६ वर्षीय तरूणीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्य तापलंय. पुण्यातील या संतापजनक घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. सर्वसामांन्यापासून ते मंत्र्यांपर्यंत प्रत्येकांनी संताप व्यक्त केला आहे. तरूणीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांना सुचनाही दिल्या आहेत.

या संतापजनक घटनेनंतर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अॅक्शन मोडवर आले असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना देखील सुचना दिल्या आहेत. त्यांनी म्हटलंय, 'पुण्यातील घटना अत्यंत संतापजनक आहे. आजच्या आज या प्रकरणी दिवसभरात काय कारवाई करण्यात आली, याचा अहवाल पोलिसांकडून ७ वाजेपर्यंत घेऊ. पोलीस अधिकाऱ्यांकडून आजच सीएमओ कार्यालयाला अहवाल जाणार', असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.

आरोपीला शिक्षा झाली पाहिजे

'पुण्यातील स्वारगेट बस डेपोत घडलेली घटना शरमेनं मान खाली घालणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य आहे. त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेला गांभीर्यानं घेतलंय. तसेच पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलत आहेत', असं अजित पवार म्हणालेत.

रूपाली चाकणकरांनी महिलांना केलं आवाहन

पुण्यातील स्वारगेटमध्ये तरूणीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशातच महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी महिलांना आवाहन केलं आहे. मुली, तरूणी आणि महिलांनी सार्वजनिक जीवनात वावरताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. स्वत:ची काळजी घ्या. यंत्रणांची मदत घ्या. माणसांच्या कळपात वावरतात हिंस्त्र श्वापदे वावरतात, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपण मात्र, सर्तक राहावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT