Bhagyashree Kamble
पुण्याच्या स्वारगेटमध्ये एक धक्कादायक घडलीय. एका २६ वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडलाय.
स्वारगेटच्या बस डेपोमध्ये हा प्रकार घडला आहे. २६ वर्षांची तरुणी पुण्याहून फलटणकडे निघाली होती.
पहाटेच्या सुमारास पीडित तरुणी स्वारगेट बसस्थानकात पोहोचली.
फलटणकडे जाणाऱ्या बसची ती वाट बघत डेपो उभी होती.
त्याचवेळी दत्तात्रेय गाडे हा आरोपी तिच्याकडे आला.
त्याने पीडितेशी ओळख वाढवली आणि संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
तिच्याशी गोड गोड बोलून तिच्याकडून माहिती काढून घेतली.
एसटी बस दुसरीकडे थांबल्याचे या आरोपीने तिला सांगितले आणि तिला कोपऱ्यात उभी असलेल्या शिवशाही बसमध्ये जायला सांगितले.
अंधारात कोपऱ्यात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तिला नेलं. टॉर्च लावून तरूणी पुढे गेली.
आरोपी मागून आला आणि तिच्यावर जबरदस्ती केली. लैंगिक अत्याचार करून नराधम पळून गेला.
तरूणी फलटणमध्ये गेली, पालकांना माहिती दिली, त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीचा शोध सुरू.