शिरूर हादरलं! विधवा महिलेवर आठ जणांकडून सामूहिक बलात्कार
शिरूर हादरलं! विधवा महिलेवर आठ जणांकडून सामूहिक बलात्कार SaamTvNews
महाराष्ट्र

शिरूर हादरलं! विधवा महिलेवर आठ जणांकडून सामूहिक बलात्कार

रोहिदास गाडगे

शिरूर : शिरुर तालुक्यात एका विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विधवा महिलेच्या एकटेपणाचा आणि भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेत आठ नराधमांनी सामुहिक बलात्कार केलाय. विधवा महिलेचा गैरफायदा घेत जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape) करीत होते. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. कधी घरामध्ये, शेतातील उसात, शाळेच्या पाठीमागे, नदी किनारी अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आरोपींनी तिचा लैंगिक छळ केला या प्रकरणी शिरुर पोलीस बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा :

पोलिसांनी (Police) पाच आरोपींनी अटक केली आहे. तर अन्य तीन जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सर्व नराधम आणि पीडित महिला एकाच गावातील रहिवासी आहेत, माऊली पवार, रज्जाक पठाण, काळू वाकुंज, विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पू गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज व नवनाथ वाळुंज अशी बलात्कार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत

पीडित महिला (Woman) विधवा असून घरी एकटीच राहते. महिलेच्या एकटेपणाचा आणि भोळ्या स्वभावाचा या नराधमांनी गैरफायदा घेतला. सर्व नराधम आणि पीडित महिला एकाच गावातील रहिवासी आहेत. महिला साधी असल्याने हे नराधम तिला जीवे मारण्याची धमकी देत होते. महिला घाबरुन त्यांच्या सोबत जात होती. आरोपी (Accused) वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करीत होते. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. कधी घरामध्ये, शेतातील उसात, शाळेच्या पाठीमागे, नदी किनारी अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आरोपींनी तिचा लैंगिक छळ केला.

अखेर महिलेला हा त्रास असह्य झाल्याने तिने हिंमत करुन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडला प्रकार कथन केला. यानंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत या आठ जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा (Rape Case) दाखल केला. यापैकी पाच आरोपींच्या पोलिसांच्या मुसक्या आवळल्या असून तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पलायन करणाऱ्या तिघांचाही पोलीस शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti Sabha: मुंबईकरांसाठी तुम्ही काय केलं? शिवाजी पार्कात देवेंद्र फडणवीसांनी 'इंडिया' आघाडीकडे मागितला हिशोब

Today's Marathi News Live: निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर झाली पाहिजे, ना की धर्म, जातीपातीवर; शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडूंनी सुनावलं

BJP VS Thackeray Group: मुलुंडमध्ये ठाकरे गट-भाजप कार्यकर्ते भिडले; BJP वॉर रूमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप

MI vs LSG, IPL 2024: राहुल- पुरनची तुफान फटकेबाजी! मुंबईला जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज

Maharashtra Politics 2024 : प्रमोद महाजन असते तर मोदी पंतप्रधान असते का? इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT