Savitribai Phule University hostel Cockroach larvae  SaamTV
महाराष्ट्र

Pune News : पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, १५ दिवसात दुसऱ्यांदा जेवणात किडे; फोटो व्हायरल

Pune University Hostel Cockroach in Food : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक आठ या ठिकाणी १५ दिवसात दुसऱ्यांदा जेवणामध्ये किडे सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. ठेकेदाराकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं यावरुन दिसून येत आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वसतिगृहात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. वसतिगृहाच्या जेवणात चक्क झुरळ आणि अळ्या आढळून आल्या आहेत. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मेस चालकास जाब विचारून मेस बंद केली आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक आठ या ठिकाणी १५ दिवसात दुसऱ्यांदा जेवणामध्ये किडे सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. ठेकेदाराकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं यावरुन दिसून येत आहे. विद्यार्थ्यांकडून वारंवार तक्रार करूनही विद्यापीठाकडून कोणतीही कारवाई होत नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे.

दरम्यान, पुणे विद्यापीठाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. काही दिवसांपूर्वी विद्यापीठात उंदरांनी सुळसुळाट घातला होता. पण प्रशासनाकडून कोणताही उपाययोजना केली जात नाही. उंदरांनी चावा घेतल्यामुळे एक विद्यार्थी जखमी झाला होता. इतकेच नाही तर पुणे विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांना रेबिज आजाराची लक्षणं आढळून आली होती. विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू, सरकारी शाळेची पोलखोल करणं जीवावर बेतलं; धक्कादायक घटनेने खळबळ

'मुन्नाभाई MBBS' फेम बॉलिवूड अभिनेत्याच्या कारचा गोव्यात भीषण अपघात; बाप-लेकाला उडवलं, VIDEO व्हायरल

Appendix cancer: पोट फुगीमागे लपलाय अपेंडिंक्सचा कॅन्सर? 'ही' 5 लक्षणं दिसली तर समजा सुरुवात झालीये

UGC NET 2026: ३ विषयांची फेरपरीक्षा होणार; प्रश्नपत्रिकेतील गोंधळानंतर NTA ची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नवीन विमानसेवेची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT