CLASSROOM HORROR IN PUNE: CLASS 10 STUDENT BRUTALLY MURDERED Saam Tv
महाराष्ट्र

10 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर, वर्गात घुसून चिरला विद्यार्थ्याचा गळा

Shocking Gang War Among Teenagers: पुणे जिल्ह्यात हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चक्क वर्गात घुसून एका विद्यार्थ्याची हत्या झाली आहे. नेमकी ही घटना कुठे घडली आहे? त्यामागे काय कारण आहे?

Snehil Shivaji

शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात आता पेन-पेन्लिस ऐवजी कोयते सुरे उघड उघड एकमेंकाचे गळे चिरू लागलेत. होय शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या राजगुरूनगरमध्ये एका खासगी क्लासेसमध्ये वर्ग सुरू असताना एका 10 वीच्या विद्यार्थ्याची थेट गळा चिरुन हत्या करण्यात आलीये. पुण्यात गँगवार, कोयता गँग, चड्डी गँग काही आता नवीन राहिलेलं नाही...मात्र आता हा रक्तरंजित गुन्ह्यांचा थरकाप उडवणारा नंगानाच थेट लहानग्यांचा वर्गात जाऊन पोहचलाय...

राजगुरूनगरमधील संस्कार या खासगी क्लासेसमध्ये काही दिवसांपूर्वी या मुलांमध्ये थेट क्लासमध्येच वाद झाल्याचा आरोप मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलाय. मात्र यासंदर्भात क्लासेसवाल्यांनी कोणतीही कल्पना दिली नसल्याचाही दावा वडिलांनी केलाय.

जर या वादासंबंधी क्लासचालकांनी आधीच संबंधीत पालकांना माहिती दिली असती तर हा वाद हत्येपर्यंत गेला नसता आणि या तरुण मुलाचा जीव वाचला असता. मात्र आता थेट अल्पवयीन मुलंही हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याकडे सर्वास वळतायत...कारण पोलिसांचा धाक उरला नसल्याचंच हे चित्र आहे. मात्र पुण्यातल्या या घटनेमुळे

कायदा सुव्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगली गेली आहेत एवढं नक्की..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT