Pune Rain Update
Pune Rain Update Saam Tv
महाराष्ट्र

बघता बघता पूराच्या लोंढ्यासोबत वाहून गेला तरुण; व्हिडीओ व्हायरल

रोहिदास गाडगे

पुणे: जुन्नर परिसरात पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. नाणेघाट घाटघर, गोद्रे परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची बँटिंग सुरु आहे. अशातच जुन्नर तालुक्यातील गोंद्रे गावातील एक व्यक्ती घरी जात असताना पाण्याच्या प्रवाहात गेला. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्या व्यक्तीला थांबण्याचे आवाहन केले. मात्र घरी जायचे म्हणून तो व्यक्ती पुढे गेला. यावेळी ओढ्यातील खडकावरुन पाय निसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडला.

ओढ्यातील पाण्याचा जोर जास्त असल्याने पाण्यात पडलेला व्यक्ती वाहून गेला मागच्या चार तासांपासून त्या व्यक्तीचे शोधकार्य सुरु असून, अद्याप शोध लागला नसून ओळखही पटलेली नाही. दरम्यान त्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. (Pune Rain Update)

पश्चिम महाराष्ट्रात येत्या ४८ तासात अतिवृष्टी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाला (Rain) सुरूवात झाली आहे. राज्यात काही भागात अतिवृष्टी झाली आहे. गडचिरोली, नागपूर, नंदूरबारमध्ये पावसाने पूरस्थिती निर्माण झाली, तर कोल्हापुरातही नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. पुणे जिल्ह्यात येत्या ४८ तासात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे शहरातही दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे पुण्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात येत्या ४८ तासात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहरात देखील हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात असणाऱ्या घाट परिसरात देखील पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. पुण्यासोबतच पश्चिम महाष्ट्रातील इतर जिल्ह्यात देखील अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Latest Update)

कोल्हापुरात कालपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. असाच पाऊस (Rain)सुरू राहिला तर पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकडेच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर जिल्ह्यत नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

सांगलीतही कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अलमट्टी धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पातळी अजुनही इशारा पातळीकडे गेलेली नाही. वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. (Maharashtra Rain Latest Update)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT