BMC : '२० वर्षात रस्त्यांवर २१ हजार कोटी रुपये खर्च, तरीही...'; खड्ड्यांच्या प्रश्नावरून भाजप आक्रमक

मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे पुढील ४८ तासांत पूर्ववत करण्यात यावेत, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे (BJP) शिष्टमंडळाने आमदार मिहीर कोटेचा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.
Bmc and bjp
Bmc and bjp saam tv

सुशांत सावंत

मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे पुढील ४८ तासांत पूर्ववत करण्यात यावेत, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे (BJP) शिष्टमंडळाने आमदार मिहीर कोटेचा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे पुढील ४८ तासांत भरण्यात येतील, असे आश्वासन भाजपच्या शिष्ठमंडळाला दिले आहे. (Mumbai News In Marathi )

Bmc and bjp
ठाकरेंची शिवसेना गड राखणार की शिंदेंची शिवसेना बाजी मारणार?

भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या नेत्वृत्वाखाली महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दिलेल्या भेटीदरम्यान गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, नगरसेविका रेणू हंसराज आदी उपस्थित होते. यानंतर भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून मुंबई महापालिकेवर दोन दशकाहून अधिक काळ सत्ता असणाऱ्या शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

आमदार मिहिर कोटेचा म्हणाले, 'मुंबई शहरात गेल्या २० वर्षात २१ हजार कोटी रुपये रस्ते बनविण्यासाठी खर्च करण्यात आला. मात्र तरीही प्रत्येक पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. परिणामी मुंबईतील नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो. वाहनांचा खोळंबा होतो. याही पावसाळ्यात मुंबईतील (Mumbai) अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींनी त्या त्या विभागातील रस्ते अभियंत्यासोबत खड्ड्यांची पाहणी केली असता खड्ड्यांची परिस्थिती अतिशय बिकट असल्याचे निदर्शनास आले'.

Bmc and bjp
सामन्यांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करणार : एकनाथ शिंदे

मुंबईतील सदर परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन मुंबईकरांना चांगले दर्जेदार खड्डेमुक्त रस्ते मिळाले पाहिजेत, अशी आग्रही भूमिका यावेळी आमदार कोटेचा यांनी मांडली. महापालिका आयुक्तांनी यास सकारात्मक प्रतिसाद देत येत्या ४८ तासांत खड्डे पूर्ववत करण्यात येतील असे आश्वासित केले व तशा प्रकारचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले, असेही आमदार कोटोचा यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com