भूषण शिंदे
मुंबई : आज गुरू पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दादर शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठात जाऊन आनंद दिघे यांना वंदन केले. दोन्ही गुरूंच्या अभिवादनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सामन्यांना न्याय देण्याचे काम आमचे युतीचे सरकार करणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. (Eknath Shinde News )
एकनाथ शिंदे म्हणाले,'आमच्या भूमिकेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय. गुरू पौर्णिमेनिमित्त दादरला शक्ती स्थळावर गेलो होतो. त्यानंतर ठाण्यात आलो. आनंद मठात आनंद दिघे यांना वंदन केले. सामन्यांना न्याय देण्याचे काम आमचे युतीचे सरकार करणार आहे. माझ्या पाठिशी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आहे. उल्हासनगरचे १७ आणि नाशिकचे अनेक नगरसेवक पदाधिकारी आम्हाला पाठिंबा देत आहेत. शरद पवार (Sharad Pawar) साहेब मोठे नेते आहेत, त्यांचा नेहमीच आदर केला आहे. राज्यात जे ५० आमदार हे आमच्या सोबत आहेत. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका सुरुवातीपासून खासदारांची होती'.
राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय - एकनाथ शिंदे
गेल्या आठवडाभरापासून राज्यात मुसळधार पावसाने धडाका घातला असून अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांलड्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकराने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना आखण्यास सुरवात केली आहे. राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष आहे.
सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत आहे. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (Manukumar Srivastava) यांच्याशी चर्चा झाली असून त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याच्या निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.