Pune Rain Update saam tv
महाराष्ट्र

Rain Alert in Maharashtra : पुण्यासह ३ जिल्ह्यांना ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा, तर १५ जिल्ह्यासाठी उद्या 'यलो अलर्ट'

Rain Forecast : पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

प्रविण वाकचौरे

Maharashtra Rain Update : पुढील ४ दिवस राज्यात जोरदार  पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यात 21 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात उद्या 'यलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दोन दिवस संपूर्ण कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असून कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधारचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात जून महिन्यात कमी पावसाची नोंद

पुणे शहरामध्ये यंदा जून महिन्यात ८३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षांमधील या महिन्यातील हा तिसरा सर्वात कमी पाऊस नोंदवला गेला आहे. २०१४ मध्ये केवळ १३.८ मिमी पडला होता, तर २०२२ मध्ये ३५ मिमीची नोंद झाली होती. जुलै महिन्यातील १५ दिवस संपले असून, आतापर्यंत केवळ ४० मिमीची नोंद झाली असून ही गेल्या १० वर्षांमधील सर्वात कमी पावसाची नोंद ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडमध्ये दाखल

Cardio Workout at Home: घरच्या घरी करा कार्डिओ वर्कआउट; फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी या ७ एक्सरसाइज बेस्ट

Goregaon Mulund Link Road: दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी आता सुसाट जा, फ्लायओव्हर या दिवशी होणार सुरू; गोरेगाव मुलुंड लिंकरोडवर मोठी अपडेट

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

SCROLL FOR NEXT