Pune Police Station Saam TV marathi
महाराष्ट्र

Pune Police : पुण्यात खाकीला डाग! पोलीस स्टेशनमध्येच महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे; हवालदाराचे तडकाफडकी निलंबित

Pune police constable suspended after misconduct complaint : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपायासोबत गैरवर्तन केल्याच्या तक्रारीनंतर हवालदार किरण दत्तात्रय देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune Police Station : पुण्यात कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस ठाण्यातच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस शिपायासोबत गैरवर्तन करणे एका वरिष्ठ हवालदाराला चांगलेच महाग पडले आहे.

पीडित महिला कर्मचाऱ्याने हिम्मत दाखवून दिलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत, चौकशीअंती दोषी आढळलेल्या किरण दत्तात्रय देशमुख या पोलीस हवालदाराला पोलीस उपायुक्तांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

पुण्यात पोलीस स्टेशनमध्येच महिला शिपायासोबतच गैरवर्तन केल्याप्रकरणी किरण दत्तात्रय देशमुख यांचं निलंबन करण्यात आले आहे.पोलीस हवालदार किरण दत्तात्रय देशमुख यांनी पुणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस शिपायासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. आयुक्तांनी देशमुख यांचं तडकाफडकी कारवाई करत निलंबन केले आहे.

किरण दत्तात्रय देशमुख असं निलंबित केलेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे. हवालदार किरण देशमुख भारती विद्यापीठ पोलीस स्थानकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे लेखनिक म्हणून काम करत होते. दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये एका काम करणाऱ्या महिला पोलीस शिपाई सोबत किरण देशमुख यांनी गैरवर्तन केल्याचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता.

या प्राप्त अर्जाची चौकशी केल्यानंतर किरण देशमुख हे त्यामध्ये दोषी आढलले आहे. त्यानंतर पोलीस उपायुक्त यांनी देशमुख यांच्यावर कारवाई करत निलंबित केले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पण पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलीस सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांचं काय? असा संताप सर्वसामान्यांकडून व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात राष्ट्रवादीच्या २ बड्या नेत्यांविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Banana : केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, वर्कआऊटपूर्वी की रात्रीच्या जेवणानंतर?

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

SCROLL FOR NEXT