पुणे : दहशतवादी/राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायको-लाईट, एअरक्राप्ट, पॅराग्लायडरचा वापर करुन त्यांचे हल्यामध्ये आणि त्याव्दारे व्हीव्हीआयपींना लक्ष्य करु शकतात. मोठया प्रमाणावर सार्वजनिक जीवन धोक्यात आणू शकतात, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करु शकतात, आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतात. त्यामुळे पुणे पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अशा ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायको-लाईट, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडरव्दारे संभाव्य घातपात रोखण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अशा घटकांच्या कारवाया, त्यासाठी काही प्रतिबंधात्मक सक्रीय उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो - लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्ड्स, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून इत्यादीच्या उड्डाण क्रियांना पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश पुढील ३० दिवसांसाठी म्हणजे आजपासून ६ एप्रिल ते ५ मेपर्यंत देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असं देखील सांगण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.