Pune News Saam tv
महाराष्ट्र

Dam Water Storage : राज्यातील पाणीसंकट मिटले; गतवर्षीच्या तुलनेत धरणात दुपटीने वाढला पाणीसाठा

Pune News : राज्यात जलसाठा ५९.१६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच काळात हा साठा अवघा २८.२८ टक्के होता. यात सर्वाधिक धरणसाठा हा कोकण विभागात ७५.०६ टक्के एवढा झाला आहे

Rajesh Sonwane

सचिन जाधव

पुणे : गतवर्षी चांगला पाऊस झाल्यानंतर देखील राज्यात पाणी संकट निर्माण झाले होते. मात्र यंदा मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि यानंतर सुरु असलेल्या मॉन्सूनच्या पावसामुळे राज्यातील सर्वच धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. राज्यातील धरणसाठा ६० टक्क्यांवर पोहचला असून गतवर्षीच्या तुलनेत याच दिवसात असलेल्या साठ्यात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील पाणीसंकट दूर झाले आहे.  

राज्यात बहुतांश ठिकाणी मे महिन्यात मॉन्सून पूर्व आणि मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली. मे आणि जून या दोन्ही महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्यातील सर्वच धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. सध्या राज्यात जलसाठा ५९.१६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच काळात हा साठा अवघा २८.२८ टक्के होता. यात सर्वाधिक धरणसाठा हा कोकण विभागात ७५.०६ टक्के एवढा झाला आहे. तर पुणे विभागत ६९.५६ टक्के पाणीसाठा एवढा झाला आहे.

पुणे विभागामध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा
विदर्भात गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमध्ये भरपूर पाणी साठा वाढला असून पुणे विभागातील धरणसाठा हा ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पुणे विभागामध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. असेच पुण्यातील खडकवासला प्रकल्पामध्ये २१.६२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. म्हणजेच ७४.१६ टक्के धरणात उपयुक्त पाणीसाठा आहे. खडकवासला धरणप्रकल्पामध्ये टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला धरणांचा समावेश होतो. तर सध्या नागपूर, अमरावती विभागात ४७ टक्के तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये ४४ टक्के पाणीसाठा आहे. 

असा आहे पाणीसाठा 
राज्यातील एकूण धरणे - २,९९७
मोठी धरणे - १३८
मध्यम धरणे - २६०
लघू धरणे - २,५९९

विभाग -- धरण -- धरणसाठा (टक्के)
नागपूर -- ३८३  -- ४७.९२
अमरावती -- २६४ -- ४७.७७
छत्रपती संभाजीनगर -- ९२० -- ४४.६७
नाशिक -- ५३७ -- ५६.२९
पुणे -- ७२० -- ६९.५६
कोकण -- १७३ -- ७५.०६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2025 : सलमान खान ते करीना कपूर; बॉलिवूडमधील ८ सुपरकूल भावंडे

Password Security: 'हा' पासवर्ड वापरत असाल तर थांबा! हॅकर्स करू शकतात फक्त एका सेकंदात क्रॅक

देवाभाऊ महिन्याला ₹१५०० नको, लाडकीचं मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, साताऱ्याचे नेमकं प्रकरण काय?

Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण; मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या मोबाईलचा सीडीआर सार्वजनिक करण्याची मागणी

Rules for removing rakhi: बहिणीने भावाला बांधलेली राखी मनगटावर किती दिवस ठेवावी? जाणून घ्या राखी काढण्याचे नियम

SCROLL FOR NEXT