Pune News Tomato Saam tv
महाराष्ट्र

Pune News : टोमॅटोचे वाढले दर; भाव विचारल्‍यावरून ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये हाणामारी

टोमॅटोचे वाढले दर; ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये हाणामारी

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

पुणे : टोमॅटोच्या वाढत्या दराचा परिणाम घरात पहावयास मिळाला. मात्र या वाढत्‍या दरामुळे आता बाजारात (Tomato) देखील वाद होवू लागले आहेत. असा प्रकार पुण्यातील (Pune) वडगाव शेरी भागात घडला आहे. येथे ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये थेट हाणामारी झाली आहे. (Tajya Batmya)

पुण्यातील वडगाव शेरी भागातील बाजारपेठेत हा प्रकार घडला. फिर्यादी गोपाल ढेपे हे भाजी आणण्यासाठी वडगाव शेरी येथील भाजी मार्केटमध्ये गेले होते. त्यांनी भाजी विक्रेते अनिल गायकवाड यांनी टोमॅटोचा भाव विचारला. त्यांनी टोमॅटो २० रुपये पावशेर असल्याचे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी त्यांना खूप महाग आहेत असे उत्तर दिले. त्यावरुन त्यांच्या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले आणि याचे रूपांतर हाणामारी मध्ये झाले.

ग्राहक जखमी

आरोपीने फिर्यादीचे तोंडावर बुक्कीने मारहाण करुन वजनकाट्यातील वजन हातात घेऊन त्यांच्या उजव्या गालावर मारुन जखमी केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी गोपाल गोविंद ढेपे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदननगर पोलिसांनी अनिल गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :परळीत धनंजय मुंडे आघाडीवर

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT