Fake Facebook Account : भाजप आमदाराच्या फेसबुक अकाउंटवरून महिलांना हाय, हॅलोचे मेसेज; बनावट अकाउंट करणारा तरुण गजाआड

भाजप आमदाराच्या फेसबुक अकाउंटवरून महिलांना हाय, हॅलोचे मेसेज; बनावट अकाउंट करणारा तरुण गजाआड
Fake Facebook Account
Fake Facebook AccountSaam tv
Published On

अभिजीत देशमुख

कल्याण : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने बनावट फेसबुक एकाउंट (Fake Account) तयार केले. यानंतर महिलांना हाय, हॅलो, तुम्ही भेटू शकता का? असे मेसेज पाठवणाऱ्या तरुणाला कल्याण कोलशेवाडी पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्यात. (Live Marathi News)

Fake Facebook Account
Sambhajinagar News : तु एकटी आहेस का, मोबाईल नंबर दे..; रिक्षा चालकाने काढली प्रवासी तरुणीची छेड

काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व विधानसभेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांच्या आवाजाऐवजी कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज टाकण्यात आला होता. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना काही दिवसापूर्वी त्यांच्या नावाने फेसबूकवर फेक आकाऊंट तयार आले आहे. त्याद्वारे महिलांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली जात आहे. त्यामध्ये हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, तुम्ही भेटू शकता का असा मेसेजही पाठविला जात होता.

Fake Facebook Account
Bribe Trap : कामाचे बिल काढण्यासाठी ३६ हजार रुपयांची मागणी; लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

महिलांनी आमदारांनाच विचारल्‍याने समोर आला प्रकार

काही महिलांनी आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांना तुम्ही आम्हाला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली आहे का?असे विचारले. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी आमदार गायकवाड यांनी कोलशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी उल्हास जाधव, हरिदास बोचरे यांनी तपास सुरु केला. या प्रकरणात कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी फेक आकाऊंट तयार करत महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मेसेज करणाऱ्या चंदन शिर्सेकर या तरुणाला बेड्या ठोकल्या.

Fake Facebook Account
Nashik Crime News : चोरट्यांनी थेट एटीएमच मशीन नेले चोरून; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

ओला चालक चंदन

या प्रकरणात चंदन सुभाष शिर्सेकर या २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. चंदन हा कोळसेवाडी परिसरात राहणारा आहे. तो ओला गाडी चालक आहे. चंदन फक्त दहावी शिकला आहे. विशेष म्हणजे तो पकडला जाऊ नये; यासाठी दुसऱ्यांचे वायफाय आणि हॉटस्पॉटचा वापर करीत होता. रविवारी दुपारी चंदनला कल्याण न्यायालयात हजर केले आहे. चंदनने हा प्रकार का केला, कोणाच्या सांगण्यावरुन केला आहे का? असे मेसेज पाठवून काही आर्थिक फायदा केला आहे का? या विविध प्रश्नाचा शोध पोलिस घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com