Pune Tragedy Saam tv
महाराष्ट्र

Pune Tragedy : एकाच कुटुंबातील तिघांचा शॉक लागून मृत्यू; ती काही मिनिटं आणि पती-पत्नी, मुलासोबत घडलं भयंकर

Pune News : उत्तर सोलापूरचे मूळ रहिवाशी असलेले सुनील भालेकर हे कुटुंबासह कामाच्या निमित्ताने आले होते. दापोडी- केडगाव परिसरात बांधकाम क्षेत्रात सेंट्रिंगचे काम ते करत होते

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सचिन जाधव

पुणे : कामानिमित्ताने बाहेर गावाहून आलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेत पती, पत्नी व त्यांच्या मुलगा मृत्यूमुखी पडले असून हि घटना दौड तालुक्यातील दापोडी येथे आज सकाळच्या सुमारास घडली आहे. 

उत्तर सोलापूरचे मूळ रहिवाशी असलेले सुनील भालेकर हे कुटुंबासह कामाच्या निमित्ताने आले होते. दापोडी- केडगाव परिसरात बांधकाम क्षेत्रात सेंट्रिंगचे काम ते करत होते. सुनील देवीदास भालेकर (वय ४५), आदिका सुनील भालेकर (वय ४०) व परशुराम सुनील भालेकर (वय १७) तिघेही रा. दापोडी यांचा या घटनेत मृत्यू (Death) झाला आहे.

सुदैवाने मुलगी वाचली 
सुनील भालेकर घरासमोर रुमाल वाळायला घालत असताना त्यांना विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का लागल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी त्यांची पत्नी आदिका प्रयत्न करत होती. याच वेळी त्यांनाही विजेचा धक्का (Electric Shock) बसला. तर या दोघांना वाचवण्यासाठी मुलगा परशुरामने त्यांना ओढून वाचवायचा प्रयत्न करू लागला. मात्र त्यालाही विजेचा धक्का बसला. यात तिघांचाही मृत्यू झाला. तर त्यांची एक मुलगी शिकवणीसाठी बाहेर गेल्याने ती या दुर्घटनेतून वाचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुका लागताच भाजपला धक्का; दिग्गजांचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी भाजपाची जोरदार तयारी

वादळाचा तडाखा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती कोसळली, पाहा व्हिडिओ

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याचे दर घसरले; १० तोळ्यामागे १५,००० रुपयांची घसरण; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे भाव

Winter Health : सावधान! थंडीत रात्री झोपताना तोंडापर्यंत ब्लँकेट घेताय? 'ही' चूक पडेल महागात

SCROLL FOR NEXT