Pune Airport Saam tv
महाराष्ट्र

Pune Airport : बँकॉक वरून आलेल्या प्रवासीकडून ६ कोटींचा गांजा जप्त; पुणे विमानतळावर मोठी कारवाई

Pune News : विमानातून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी केली जात असते, असे असताना देखील बँकॉक वरून विमानाने प्रवास करत पुणे विमानतळावर आलेल्या प्रवाशाजवळ गांजा आढळून आला आहे

Rajesh Sonwane

पुणे : गांजाची चोरून लपून वाहतूक तसेच विक्रीचे प्रकरण समोर येत आहेत. कारवाई होऊन देखील गांजा तस्करी थांबलेली नाही. यातच पुणे विमतनतळावर बँकॉक वरून आलेल्या एका प्रवासीकडून तब्बल ६ कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. कस्टम विभागाकडून हि मोठी कारवाई करण्यात आली असून यामुळे खळबळ उडाली आहे. 

पुणे विमानतळावर कस्टम विभाग आणि एअर इंटेलिजन्स युनिट कडून करण्यात आलेल्या कारवाईत अतुल सुशील हिवळे या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई ५ ऑगस्टला पुणे विमानतळावर कस्टम विभाग आणि एअर इंटेलिजन्स युनिट कडून करण्यात आली. बँकॉक ते पुणे असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेस या विमानातून हा प्रवासी आला होता. हा प्रवासी संशयास्पद असल्याचं संबंधित विभागाला लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रवाशाला चौकशीसाठी बोलावले.

गुन्हा दाखल करत प्रवाशी ताब्यात 

अतुल हिवळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता चौकशी दरम्यान त्याच्या ट्रॉली बॅगची तपासणी करण्यात आली. यात त्याच्या बॅगमध्ये ६ किलो गांजा मिळून आला. बाजारभावानुसार ६ किलो गांजाची किंमत साधारण ६ कोटी १२ लाख असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

छापेमारी करत १९ लाख रुपयांची गावठी दारू जप्त
मावळ
: पुणे मार्केट यार्ड, सेल पिंपळगाव आणि आंबी मावळ येथील विविध हातभट्ट्यावर छापे मारत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने १९ लाख ७१ हजार २०० रुपयांची दारू जप्त केली आहे. एकूण पाच गुन्ह्यांमध्ये चार आरोपीसह ३२२० लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण १९ लाख ७१ हजार रुपये किमतीचा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवा राठोड, सोमनाथ थोटे, विष्णू उदावंत आणि सुशील सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT