Baramati Farmer News Saamtv
महाराष्ट्र

Farmer News: शेतकऱ्याची थट्टा! 95 किलो वांग्याचे मिळाले अवघे 66 रुपये; संतापाने 11 गुंठ्यातील वांग्याचे पीकचं टाकले उपटून

आत्तापर्यंत ५६,००० रुपये इतका खर्च झाला आहे. मात्र ५००० रुपये सुद्धा हातात पडले नाहीत, अशी व्यथा या शेतकऱ्याने मांडली आहे....

मंगेश कचरे

Baramati : सध्या कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. 800 किलो कांद्याचे 2 रुपये शेतकऱ्याला मिळाल्याची बातमी सर्वत्र चर्चेत आहे, ज्यामुळे संताप व्यक्त केला जात असतानाच बारामतीत आणखी एक असाच प्रकार घडला आहे. पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील शेतकऱ्याला 100 किलो वांग्याचे केवळ 66 रुपये मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्यानंतर संतप्त शेतकऱ्याने ११ गुंठ्यातील वांगीच उपटून टाकली आहेत. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, नाना चिवटे या शेतकऱ्याने पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये आपल्या शेतातील वांग्याची विक्री करण्यात केली होती. या विकलेल्या १०० किलो वांग्याचे अवघे ६६ रुपये शेतकऱ्याच्या हातात आले. ज्यामुळे ते चांगलेच संतापले. यानंतर हताश झालेल्या शेतकऱ्याने आपल्या ११ गुंठे शेतातील वांग्याचे पीकच उपटून टाकले आहे.

शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग प्रचंड निराश झाला आहे. या वांग्याला आत्तापर्यंत ५६,००० रुपये इतका खर्च झाला आहे. मात्र ५००० रुपये सुद्धा हातात पडले नाहीत, अशी व्यथा या शेतकऱ्याने मांडली आहे.

सध्या राज्यात सर्वच शेतमालाचे भाव पडले आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. तीन महिने कष्ट करून पिकविलेल्या पिकाच्या काढणीचा खर्चसुद्धा निघत नाही. राज्यकर्त्यांनी एकमेकाची उणीधुणी काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना हमी भाव कसा मिळेल याकडे लक्ष द्यावं असे, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (Baramati)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ३ ट्रकचा भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

Sugar Free Sweet Recipes : गोड खाण्याची इच्छा होतेय? झटपट बनवा 'हा' शुगर फ्री हलवा, मधुमेही रूग्णही आवडीने खातील

Vastu Shastra: पैशाची चणचण, जीवनात अडी-अडचण येतेय? अंथरुणातील 'ही' चूक बदलतेय तुमची ग्रह दशा

गुजरातमध्ये पैशांचा पाऊस, पोती भरून भरून उधळल्या गायकावर नोटा, VIDEO व्हायरल

महिलांच्या 'या' भागावर तीळ म्हणजे नवऱ्यासाठी भाग्यवान, नशिब बदलतं

SCROLL FOR NEXT