Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune : डॉक्टराकडून ड्रग्सची तस्करी; पुण्यात समोर आला धक्कादायक प्रकार, ११ लाख रुपयांचे एमडी जप्त

Pune News : पोलिसांनी ताब्यात घेतलेला डॉक्टर एका नामांकित रुग्णालयात प्रॅक्टिस करत असताना त्याला यापुर्वीही ड्रग्ज प्रकरणातच पकडले होते. यानंतर या डॉक्टरला निलंबित करण्यात आले होते

Rajesh Sonwane

अक्षय बडवे

पुणे : अनेकदा कारवाई होऊन देखील एमडी ड्रग्स तसेच अंमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. यात पुणे शहरातील एका डॉक्टराकडून एमडी ड्रग्स तस्करी केली जात असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात पोलिसांनी कारवाई करत ११ लाख रुपयांचा एमडी जप्त करण्यात आले आहे. 

पुणे शहरात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान पुण्यात एका निलंबित एमबीबीएस डॉक्टरसह तिघांना पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक, म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलेला डॉक्टर एका नामांकित रुग्णालयात प्रॅक्टिस करत असताना त्याला यापुर्वीही ड्रग्ज प्रकरणातच पकडले होते. यानंतर या डॉक्टरला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता त्याला दुसऱ्या वेळेस पकडण्यात आले आहे. 

जम्मू येथील एका तरुणाचा समावेश 

यातील एक आरोपी हा मुळचा जम्मूचा असून त्याचे एमबीबीएसचे शिक्षण झालेले आहे. त्याने डॉक्टर म्हणून काही रुग्णालयात काम देखील केले होते. पुण्यातील मध्यभागात असलेल्या एका नामांकित रुग्णालयात तो प्रॅक्टिस देखील करत होता. परंतु, त्याला काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी ड्रग्जप्रकरणात पकडले होते. नंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. या तिघांकडून तब्बल ११ लाख ४३ हजार रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे.

पुण्यातील बिबवेवाडी भागात ड्रग्जची तस्करी करणारे काही तरुण आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हि माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता तिघांकडून एकूण १५ लाख ७३ हजार रुपयांचे ड्रग्स मिळून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: 'माझ्याशी एकट्यात फ्लर्ट करते...'; अभिषेक बजाजने तान्या मित्तलची केली पोलखोल, लावले गंभीर आरोप

Maharashtra Politics: चिखली द्या, बुलढाणा घ्या! शिवसेना आमदाराची थेट भाजपकडे मागणी, नेमकं काय घडलं? VIDEO

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्यापूर्वी हात-पायांमध्ये दिसतात ५ मोठे बदल; 99% लोकं करतात दुर्लक्ष

Maharashtra Live News Update: शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्या जेरबंद

Chanakya Niti: तोंडावर गोड अन् मागे वाईट बोलणाऱ्यांना कसं हाताळायचं?

SCROLL FOR NEXT