MPSC exam SaamTv
महाराष्ट्र

Pune News: UPSC नंतर MPSCमधील दिव्यांग कोटा संशयाच्या भोवऱ्यात! ८ अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी; प्रमाणपत्रांची फेर पडताळणी होणार

MPSC Exam Latest News: महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा-२०२२च्या निवड यादीतील ८ जणांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आता या प्रमाणपत्रांची पुन्हा तपासणी होणार आहे.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, ता. २९ जुलै २०२४

पूजा खेडकर प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगावरील दिव्यांग प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असतानाच एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील दिव्यांग प्रमाणपत्रेही संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा-२०२२ च्या निवड यादीतील ८ जणांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आता या प्रमाणपत्रांची पुन्हा तपासणी होणार आहे.

याबाबतत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत घोटाळ्याचा आरोप झाला आहे. एमपीएससीची राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आठ विद्यार्थ्यांनी बनावट / बोगस अपंगत्व/ दिव्यांग प्रमाणपत्त्रं दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता या आठही उमेदवारांच्या अपंगत्व प्रमाणपत्राची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरन अर्थात मॅटने चौकशी सुरू केली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिलेल्या माहितीवरुन एमपीएससीच्या 2022 मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेत 22 दिव्यांग उमेदवार पात्र ठरवले होते. यापैकी आठ उमेदवारांवर बनावट किंवा बोगस दिव्यांग प्रमाणपत्रचा आक्षेप घेण्यात आला आहे. ⁠29 जुलैला या सर्व आक्षेप घेण्यात आलेल्या दिव्यांग उमेदवारांना त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचा फेर तपासणीसाठी उपस्थित राहायचे आहे.

दरम्यान, मॅटच्या आदेशानुसार पाच ऑगस्ट ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे . पाच ऑगस्टपर्यंत या उमेदवारांनी त्यांच्या अपंगत्व प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करून त्याची सत्यता मॅट समोर मांडायची आहे. या उमेदवारांनी त्यांच्या अपंगत्व प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी न केल्यास त्यांची निवड आपोआप रद्द होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

SCROLL FOR NEXT