अक्षय बडवे
पुणे : गुरांचे पालन करून त्यांचा उरलेला चारा तसेच शेण एका ठिकाणी जमा करून ठेवल्याचे सहजतेने नजरेस पडत असते. परंतु पुण्यामध्ये असे करणे दूध विक्रेत्यांना महागात पडले आहे. कारण अशा प्रकारे रस्त्यावर शेण टाकून अस्वच्छता केल्या प्रकरणी पुणे महापालिकेने दूध विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर न्यायालयाने तीन दूध विक्रेत्यांना दंड ठोठावला आहे.
पुणे शहरातील हडपसर परिसरात असलेल्या शिंदे वस्तीत म्हशींचे गोठे आहेत. त्या भागातून जाणाऱ्या रस्त्यावर शेण साठविले जात असल्याचे महापालिका प्रशासनाच्या पाहणीत आढळून आले होते. यानंतर सदर प्रकरणी तीन दूध विक्रेत्यांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्हा दाखल केल्यानंतर त्या तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तिघांनी चूक कबूल करत आपण गरीब असून, कुटुंबाची जबाबदारी असल्याचे न्यायालयाला सांगितले.
तिघांना ठोठावला दंड
दरम्यान न्यायालयात या दूध विक्रेत्यांनी आपले म्हणणे मांडताना तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास कुटुंबाला अडचणींना सामोरे जावे लागेल; असे तिघांनी सांगितले. त्यावर तीनही दूध विक्रेते हे कुटुंबातील एकमेव कमावते असल्याचे लक्षात घेत न्यायालयाने त्यांना दंड ठोठावला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. सय्यद यांनी हा आदेश दिला. हडपसरमधील शिंदे वस्ती येथे राहणाऱ्या तीन दूधविक्रेत्यांना दंड प्रक्रिया संहितेच्या कलम २५२ नुसार दोषी ठरवित महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत प्रत्येकी साडेपाचशे रुपयांचा दंड ठोठावला.
दूध विक्रेत्यांकडून दंड जमा
दरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संबंधित दूध विक्रेत्यांनी दंड न भरल्यास आरोपींना न्यायालय उठेपर्यंत साध्या कैदेची शिक्षा भोगावी लागेल, असे निकालात नमूद केले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार तीनही दूध विक्रेत्यांनी दंडाची रक्कम न्यायालय प्रशासनाकडे जमा केली आहे. या अशा पद्धतीने अस्वच्छता केल्याप्रकरणी दंडाची शिक्षा झाल्याची हि पहिलीच घटना आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.