Girish Bapat Passed Away
Girish Bapat Passed Away Saamtv
महाराष्ट्र

Girish Bapat Political Journey: कसब्याचे किंगमेकर! टेल्को कंपनीत कामगार ते सलग ५ वेळा आमदार; लढवय्ये गिरीश बापट यांची राजकीय कारकिर्द

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girish Bapat Passed Away: राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत दुःखद बातमी सध्या समोर आली आहे. भाजपा (BJP) खासदार पुण्याचा बुलंद आवाज गिरीश बापट (Girish Bapat) यांचे दिर्घ आजाराने दुखःद निधन झाले. त्यांना बुधवारी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 73 वर्षांचे होेते. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांचा पार्थिव दुपारी 2 ते 6 पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. (Girish Bapat Political Profile)

कोण आहेत गिरीश बापट...

गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर बापट 1973 मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. त्यानंतर दोन वर्षांतच आणीबाणीमध्ये 19 महिन्यांचा कारावास नाशिक जेलमध्ये त्यांनी भोगला.

राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणून सुरूवात...

गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक (RSS) आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. आणीबाणीच्या काळात तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत (PMC) नगरसेवक झाले.

नगरसेवक ते आमदार...

सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याचा काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर 1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली अन्‌ पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले.

1996 साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. परंतु, 2019 मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.

दांडगा जनसंपर्क, सर्वपक्षीय कनेक्शन...

गिरीश बापट हे पुण्याच्या राजकारणात ‘सर्वसमावेशक’ राजकारणासाठी ओळखले जात होते. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम साधून घेण्याचे कसब गिरीश बापट यांना उत्तम अवगत होते. दांडगा लोकसंपर्क हे गिरीश बापट यांची जमेची बाजू मानली जायची. सगळयांशी मिसळून राहण्याच्या वृत्तीमुळे गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास नेहमीच सुकर झाला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उध्दव ठाकरेंची सभा

Chhagan Bhujbal : कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करा, भुजबळांचं PM मोदींना पत्र

Ramdas Athawale: संविधान धोक्यात नाहीतर त्यांचे पक्ष धोक्यात; रामदास आठवलेंची 'इंडिया' आघाडीवर टीका

Effects of Garlic in Summer: उन्हाळ्यात लसून खाल्यास होतील 'हे' गंभीर आजार

Effects of Green Tea : डाएटमध्ये ग्रीन टी घेताय? उन्हाळ्यात ग्रीन टी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT