Pune Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस थेट शेतात; भोरमध्ये बस अपघातात ४२ प्रवाशी जखमी, तिघे गंभीर

Pune News : पुणे तालुक्यातील महुडे येथून प्रवाशांना घेऊन भोरकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली. दरम्यान बस काही अंतरावर गेल्यानंतर बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला

Rajesh Sonwane

सचिन जाधव
पुणे
: तालुक्यातील महुडे येथुन भोरकडे प्रवाशांनी भरलेल्या बसला आज सकाळच्या सुमारास अपघात झाला. बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन एका वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट शेतात घुसली. या अपघातात बसमधील ४२ प्रवाशी जखमी झाले असून यात तीन प्रवाशी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. 

पुणे (pune) तालुक्यातील महुडे येथून प्रवाशांना घेऊन भोरकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली. दरम्यान बस काही अंतरावर गेल्यानंतर बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यावेळी बस एका वळणावर असल्याने चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्ता सोडून थेट शेतात घुसली. हा अपघात सकाळी साडे दहाच्या सुमारास घडला. (Bus Accident) अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत सुरु केली. यानंतर बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. 

बस अपघातात बसमधील ४२ जण जखमी झाले आहेत. यात ३ जण गंभीर जखमी आहेत. किरकोळ दुखापत असणाऱ्या जखमींवर भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर गंभीर जखमी असलेल्या तिघा प्रवाशांना उपचारासाठी भोरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यवर आयसीयूमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

SCROLL FOR NEXT