Pune Nashik Highway accident near Chakan father and 14 year old daughter killed saam tv
महाराष्ट्र

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात: दुचाकी ट्रकखाली चिरडून बाप-लेकीचा करुण अंत; आईची मृत्यूशी झुंज

Pune-Nashik Highway Accident: पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळील वासुली येथे भीषण अपघातात बाप आणि 14 वर्षीय लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रकखाली दुचाकी चिरडली गेली असून आई गंभीर जखमी आहे.

Omkar Sonawane

रोहिदास गाडगे, साम टीव्ही

पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळील वासुली येथे अत्यंत दुर्दैवी आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच एका भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने बाप आणि 14 वर्षीय लेकीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या आईची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. अपघाताचा हा थरार जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अवसरी येथील रहिवासी असलेले राजेंद्र भोर हे आपली पत्नी आणि 14 वर्षांची मुलगी मयूरी यांच्यासह दुचाकीवरून वासुलीच्या दिशेने जात होते. पुणे-नाशिक महामार्गावरून जात असताना चाकणजवळ त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला आणि त्यांची दुचाकी थेट भरधाव ट्रकखाली आली. हा अपघात इतका भीषण होता की राजेंद्र भोर आणि त्यांची मुलगी मयूरी हे दोघेही ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले. यात दोघांचाही जागीच करुण अंत झाला. अपघातात मयूरीची आई गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने चाकण येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

भाऊ-बहिणीच्या नात्याचा आनंद साजरा करणाऱ्या रक्षाबंधनाच्याच दिवशी भोर कुटुंबावर काळाने घाला घातल्यामुळे अवसरी आणि वासुली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी

Navi Mumbai: SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई, भाजप पदाधिकाऱ्याला बेड्या, ५ BLO अधिकाऱ्यांचे निलंबन

Maharashtra Politics: २ बड्या नेत्यांसह ४० जणांविरोधात गुन्हे, राजकीय वर्तुळात खळबळ

Ration Card e-KYC Deadline: रेशन कार्डधारकांचे टेन्शन मिटलं, शासनाने e-KYC बाबत घेतला मोठा निर्णय; शेवटची तारीख काय?

Curry Leaves Storage Tips: कढीपत्ता खराब होऊ नये म्हणून करा 'हे' 7 सोपे उपाय; महिनाभर राहील फ्रेश

SCROLL FOR NEXT