Sharad Pawar and Ajit Pawar amid growing speculation of a united NCP strategy for the Pune municipal elections. Saam Tv
महाराष्ट्र

सत्तेसाठी दोन्ही पवार एकत्र, घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढणार?

Straight Fight in Pune: मुंबईनंतर पुण्याची लढत लक्षवेधी ठरणार आहे कारण भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सरळ सामना होणार आहे. पुणे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. हा गड अबाधित राहावा म्हणून पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या हालचाली आहेत.

Girish Nikam

नगरपंचायती निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या बैठकांना जोर आलाय. मुंबईनंतर पुण्यातील लढाई प्रतिष्ठेची असणार आहे. विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादी आणि भाजप स्वतंत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलंय. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. यासंदर्भात शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्याच्या मुद्यावर चर्चा झाली.

दुसरीकडे माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी मात्र पुणे शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आणि ते ही घड्याळ चिन्हावर असं जाहीर करून टाकलंय. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास शरद पवारांच्या पक्षातीलच काही नेत्यांचा विरोध आहे. आमचे उमेदवार तुतारी चिन्हावरच लढतील, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलंय...

दुसरीकडे मुंबईत आणि इतर महापालिकांबाबत राष्ट्रवादीची मविआतील पक्षांसोबत बोलणी सुरु आहे. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर नगरपंचायती निवडणुकीतही महायुतीतल्या तीनही पक्षांनी घवघवीत यश मिळवलंय. त्यामुळे विरोधकांचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळेच दोन्ही पवार एकत्र येत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेले पुणे अभेद्य राखणार का हे पाहण औत्सुक्याचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi chi bhaji recipe: गावरान स्टाईल मेथीची सुकी भाजी कशी बनवायची?

डॉक्टर की गुंड? उपचार घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून मारझोड, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

IAS Officers Transferred: ऐन निवडणुकीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली?

Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

मुंबईत वंचित-काँग्रेस साथ साथ? आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती?

SCROLL FOR NEXT