MPSC STUDENTS PROTEST: TUKARAM MUNDHE LIKELY TO GET NEW RESPONSIBILITY saam tv
महाराष्ट्र

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

Pune MPSC Students Protest : आपल्या धडक कारवाईमुळे आणि प्रामणिकपणामुळे चर्चेत असलेले एफडीएचे आयुक्त आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंवर नवी जबाबदारी देण्यात येणार आहे. ही नवी जबाबदारी म्हणजे एमपीएससीचं सचिव पद. राज्य सरकारनं विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करण्याची तयारी दर्शवलीय.

Bharat Jadhav

  • पुण्यात एमपीएससी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

  • तुकाराम मुंढे यांच्याकडे एमपीएससी सचिवपदाची जबाबदारी देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

  • या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती

पुण्यात सुरू झालेल्या एमपीएससी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलनाला यश मिळताना दिसत आहे. विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या मागण्यावर सरकार सकारत्मक असून विद्यार्थ्यांची महत्त्वाच्या मागणी पैकी एक असलेली मागणी सरकारनं पूर्ण करण्याची तयार दर्शवलीय. ही मागणी म्हणजे एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे एमपीएससीच्या चौकशी समिती आयोगाचं सचिव पद दिलं जाण्याची मागणी सरकारनं मान्य केलीय. याबाबतची माहिती भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलीय. विद्यार्थ्यांना नोकर भरतीची खूशखबर देत आंदोलन मागे घ्यावे अशीही विनंती केली.

पुण्यातील एस.एम.जोशी पुलावर एमपीएससीचे विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनाला अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवलाय. सत्ताधारी पक्षासह विरोधीपक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. आज रविवारी रात्री १० वाजता भाजप नेते शिवेंद्रराजे भोसलेंनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.

यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारचा एक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात विद्यार्थ्यांची एक मोठी मागणी मान्य केलीय. ही मागणी म्हणजे तुकाराम मुंढे यांना चौकशी समितीचं सचिव करावं. प्रामाणिक व कडक अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांना एमपीएससीच्या प्रमुख पदांवर नियुक्त करावे, अशी प्रमुख मागणी विद्यार्थी आणि आमदारांकडून केली जात होती.

दरम्यान विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं की, सरकार विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी सकारात्मक आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीचा मसुदा सरकारकडून तयार करण्यात आलाय. हा मसुदा आमदार रोहित पवार आणि विश्वजीत कदम यांच्याकडे देत आहे. या समितीचा चौकशी आयोग नेमण्यात येणार आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहवून तयार करण्यात आलाय.

या आयोगामध्ये आयोगाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलीय. ही समिती निवृत्ती न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात १६०० जागा भरल्या जाणार असल्याची खूशखबरही यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: राजापूरमध्ये खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू; एका मुलीला वाचवण्यात यश

Rice vs Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी रात्री जेवताना काय खावं

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

October Heat Home Remedie: ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालात? शरीर थंड ठेवण्यासाठी करा हे ७ सोपे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT