Pune Maval News Saam tv
महाराष्ट्र

PMPML : श्री क्षेत्र देहू- भंडारा डोंगर बससेवेचा शुभारंभ; दिवसभरात मारणार सात फेऱ्या

Pune Maval News : दिवसभरात एकूण सात फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे भाविकांना सोयीस्कर प्रवास करून दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळणार असून वेळेची देखील बचत होणार आहे

दिलीप कांबळे

मावळ : संत तुकाराम महाराजांच्या पावन देहू नगरीपासून त्यांच्या तपोभूमी भंडारा डोंगरापर्यंत भाविकांसाठी आता थेट बससेवा सुरु करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) सुरू केलेल्या या बससेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला असून या बससेवेमुळे भाविकांना येणे- जाणे सोयीचे होणार आहे. 

देहू ते भंडारा डोंगर अशी बससेवेचा शुभारंभ जिल्हा बँकेचे अध्यक्ष माऊली दाभाडे, रवींद्र भेगडे आणि भंडारा डोंगर संस्थांचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहू आळंदी आणि भंडारा डोंगरवर वर्षभर भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र डोंगरावर पायी जायला तीस ते चाळीस मिनिट लागतात. मात्र या बससेवेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

दिवसभरातून होणार सात फेऱ्या 
पुणे महापालिकेच्या परिवहन महामंडळाने सुरु केलेल्या या बससेवेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून दिवसभरात एकूण सात फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे भाविकांना सोयीस्कर प्रवास करून दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. शिवाय येण्या जाण्यासाठीचा वेळ देखील वाचणार आहे. 

सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन 
उपक्रमाबद्दल भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष हभप बाळासाहेब महाराज काशीद पाटील आणि मावळ भाजप नेते रविंद्र आप्पा भेगडे यांनी भाविकांना सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. “ही बससेवा केवळ वाहतुकीचे साधन नसून, श्रद्धा आणि अध्यात्म जोडणारा पूल आहे. संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा वारसा भाविकांपर्यंत पोहोचविण्यास ती महत्त्वाची ठरेल,” असे प्रतिपादन बाळासाहेब महाराज काशीद पाटील यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT