Maval Nephew kills uncle  Saam Tv News
महाराष्ट्र

Pune Crime : घरात सतत वाद, पुतण्याने साथीदारासोबत चुलत्याला संपवलं, कोयत्याने मानेवर सपासप वार; पुणे हादरलं

Pune Maval Murder News : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, पुण्यातील मावळमध्ये पुन्हा एकदा हत्येची बातमी समोर आली आहे. घरगुती वादातून एका पुतण्याने त्याच्या साथीदारासह आपल्या चुलत्याची हत्या केलीय.

Prashant Patil

दिलीप कांबळे, साम टीव्ही

पुणे : घरगुती वादातून पुतण्यासह एकाने चुलत्याच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास धामणे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ तालीम ता. मावळ जि. पुणे येथे घडली. शिरगाव परंदवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. महादेव भगवान गराडे (वय ७३, रा. धामणे ता.मावळ) असं हत्या झालेल्या चुलत्याचं नाव आहे.

मंगेश किसन गराडे (वय ३८, रा.धामणे मावळ) आणि एक अनोळखी असे या हत्येती आरोपी आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महादेव गराडे आणि आरोपी मंगेश गराडे यांच्यात सतत घरगुती वाद होते. त्यातून आरोपी मंगेश गराडे आणि त्याच्या एका साथीदाराने मयत महादेव गराडे यांच्या मानेवर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने महादेव गराडे यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस उपायुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, पोलीस उप निरीक्षक प्रकाश पारखे, नाईद शेख आणि पोलीस कर्मचारी उपस्थित राहून पुढील तपास करत आहेत. मावळ तालुक्यात चार दिवसात दुसरी हत्या झाली असून नात्यातील व्यक्तीची हत्या होत असल्याने दहशतीचं वातावरण निर्माण होत आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oscar 2026: करण जोहरच्या 'होमबाउंड'चा ऑस्कर २०२६ मध्ये दबदबा; टॉप १५ चित्रपटांच्या यादीत एन्ट्री

Railway Update: वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार; रेल्वेने नियम बदलले

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; प्रज्ञा सातव यांच्यानंतर आणखी एक नेता साथ सोडणार

वांगणीत रेल्वे प्रशासनाची 'अशी ही बनवाबनवी'; वनविभागाची परवानगी न घेता भूयारी मार्गाचं काम, चूक लक्षात येताच जागा बदलली

Maharashtra Politics: पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी खेळला डाव, भाजपसह ठाकरे गटाला 'दे धक्का, ८ जणांनी हाती बांधलं घड्याळ

SCROLL FOR NEXT