Pune Konkan Highway Saam Digital
महाराष्ट्र

Pune Konkan Highway : पुण्यातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग खचला; वाहतूक ५ ऑगस्टपर्यंत बंद

Pune News : पुण्यातील चांदणी चौकातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग अतिवृष्टीमुळे आदरवाडी आणि डोंगरवाडी (ता. मुळशी) घाटात खचला आहे. त्यामुळे महामार्ग 5 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Sandeep Gawade

पुण्यातील चांदणी चौकातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग 5 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चांदणी चौकातून कोकणात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आदरवाडी आणि डोंगरवाडी (ता. मुळशी) घाट परिसरातील रस्त्याला अतिवृष्टीमुळे तडे गेल्यामुळे रस्ता खचला आहे. प्रवाशांची सुरक्षा तसंच दुर्घटना टाळण्यासाठी ५ ऑगस्टपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

मुळशी तालुक्यात गेली दोन आठवड्यांपासून अतिवृष्टी होत आहे. अतिमुसळधार पावसामुळे रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. पिरंगुट घाटामध्ये जागोजागी दरडी ही कोसळल्या आहेत. चांदणी चौकातून कोकणाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भुगाव, भुकुम, पिरंगुट, शिंदेवाडी या परिसरामध्ये महामार्गावर गुडघाभर पाणी साचते.

गेल्या महिन्यात आदरवाडी येथील पिकनिक पॉईंट हॉटेलवर दरड कोसळल्याने हॉटेलमधील शिवाजी मोतीराम बहिरट यांचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला होता. आदरवाडी व डोंगरवाडी या गावाजवळील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफ रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेला असल्याने हा रस्ता खचलेला आहे. हे ठिकाण ताम्हिणी घाट वन परिसर क्षेत्रात येतं.

रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे कामे सुरू असून वाहतूक सुरक्षितेच्यादृष्टीने उपाययोजनाही करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तथापि पुढील काही दिवसात अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे. तसेच शनिवार व रविवारी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटकांची गर्दीही होत असते. त्यामुळे 5 ऑगस्टपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mens Health : पुरुषांच्या लघवीतून रक्त येणे हे गंभीर आजाराचे लक्षण आहे? वेळीच व्हा सावध अन्यथा...

Maharashtra News Live Update: नीट पेपरप्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

जयश्री नागे आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; नवऱ्याला ७ वर्षांचा तुरुंगवास, सासरची मंडळीची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं?

तस्करांचा माल सोडण्यास नकार; DRIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला थेट 'दाऊद गँग'च्या नावाने धमकी, मोठी खळबळ

Oily Skincare Routine: ऑयली स्किनमुळे चेहऱ्यावर पिंपल्स वाढलेत? मग हे ऑयली फ्री स्किनकेअर नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT