Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack in Junnar : या गावात आता दिवसा फिरायलाही भीती वाटते; शेतावर गेलेल्या महिलेला बिबट्यानं ओढत नेलं, जुन्नरमध्ये आठ दिवसांत दुसरी घटना

Junnar Pune News : जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील शेत शिवारात ही घटना घडली आहे. शेतात लागवड करण्यात आलेल्या बाजरी पिकाची राखण करण्यासाठी महिला शेतकरी गेली होती.

रोहिदास गाडगे

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात बिबट्याने चांगलाच हैदोस घातला असून परिसरात दहशत निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी (Liopard) बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज शेतात बाजरी राखायला गेलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यात महिलेचा मृत्यू झाला आहे. 

जुन्नर (Junnar) तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील शेत शिवारात ही घटना घडली आहे. शेतात लागवड करण्यात आलेल्या बाजरी पिकाची राखण करण्यासाठी महिला शेतकरी गेली होती. महिला शेतात असताना अचानक बिबट्याने महिलेवर हल्ला (Leopard Attack) केला. त्यानंतर शेतात ओढत नेले. यात महिलेचा मृत्यू (Death) झाला. 

नानुबाई सीताराम कडाळे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून ही घटना सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ काठ्या घेऊन शिवारात दाखल झाले. दरम्यान आठवड्यातील दुसरी घटना असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. 

बिबट्याची दहशत 

जुन्नर तालुक्यातील काळेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी चिमुकल्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये रोष व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आज पुन्हा दुसरी घटना घडल्याने शेतकरी वर्गात बिबट्याची दहशत वाढली आहे. शेतकरी भितीच्या छायेखाली असल्याने नागरिकांनी वन विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Crime : गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार

Amruta Dhongade: किती सुंदर हास्य तुझे, गालावरची खळी ही लाजते

Cancer prevention tips: 3 पैकी १ कॅन्सर टाळता येतो! लाईफस्टाईलमध्ये ५ बदल वाचवू शकतात तुमचा जीव; तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

Home Vastu: घरात देवघर करताना 'या' चुका टाळा, अन्यथा घरात येऊ शकेल संकट

Tanya Mittal: '१ रुपयांचं माचिस ६५ रुपयांना विकून झाले करोडपती...'; स्वतःच्या प्रेमात आंधळी तान्या मित्तल पुन्हा एकदा नको ते बरळली

SCROLL FOR NEXT