Manasvi Choudhary
नवीन वर्ष सुरू होणार आहे. अवघ्या काही तासांमध्ये आपण सर्वजण नवीन वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करणार आहे. नवीन वर्षात तुम्ही स्वत:साठी कोणते संकल्प करायचे हे जाणून घ्या.
तुम्ही जे काही खाता त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. नवीन वर्षात जास्तीत हिरव्या पालेभाज्या खाणार असा संकल्प करा.
वयानुसार शरीराचे वजन असणे अत्यंत आवश्यक आहे. निरोगी आहार आणि नियमित व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहते यामुळे कोणत्याही आजारांचा धोका येत नाही.
व्यायाम हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नवीन वर्षात उत्तम आरोग्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे व्यायाम करणे
धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे तुम्ही देखील धूम्रपान करत असाल तर नवीन वर्षात धु्म्रपान न करण्याचा संकल्प करा.
सामाजिक संबंध उत्तम आणि दिर्घायुष्यासाठी महत्वाचे आहे. नातेवाईक, मित्रमैत्रिणी , सभोवतालची मंडळी यांच्या संपर्कात राहा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.