सागर आव्हाड, साम टीव्ही
बारामती : पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यातील बारामती आणि इंदापूर तालुक्यातही कोसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यातील बारामतीत अतिवृष्टी सुरु आहे. पुण्यातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. या मुसळधार पावसात बारामतीतील नीरा डावा कालवा फुटला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीतील नीरा डावा कालव्यामध्ये लिमटेक नजिक ओढयासह पावसाचे पाणी आल्यामुळे या कालव्याची वहनक्षमता अचानक वाढली. त्यानंतर सगळीकडून आलेले पाणी कालव्यात आल्याने लिमटेकनजिक नीरा डावा कालवा फुटल्याची माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी दिली आहे.
मान्सूनपूर्व पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात बारामती परिसरात कधीच पडत नाही. तीन दिवसांत बारामती, पिंपळी, लिमटेक, काटेवाडी पटटयात अतिवृष्टी झाल्याने ओढे नाल्याचे पाणीही कालव्यात आल्याने पाण्याचा दाब वाढला आहे. या पावसामुळे कालव्याला भगदाड पडले.
मुसळधार पावसामुळे बारामती आणि इंदापूर तालुक्यांसाठी एनडीआरएफच्या दोन तुकडया रवाना झाल्या आहेत. काही वेळातच बारामती आणि इंदापूरमध्ये पोहोचणार आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.
पुण्याच्या दौंड तालुक्यातील पाटसमध्ये चार दिवसांपासून अहोरात्र पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे पाटस परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटस गाव तलाव तुडुंब भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. . पुराचे पाणी लोक वस्तीत घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मुसळधार पावसामुळे पंचक्रोशीतील अनेक वाड्या वस्त्यांचा मुख्य गावाशी संपर्क तुटला आहे. या सततच्या पावसामुळे वादळ वाऱ्यांमुळे वस्तीतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. सततच्या पावसामुळे शेत पिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्य पेठेतील दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.