Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : बैलाची दोरी अडकल्याने दूरपर्यंत ओढला गेला; आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

Pune News : शौर्य हा अंगणात खेळत होता. खेळत असताना त्याने अंगणातील बैलाला बांधलेली दोरी हातात घेतली.

Rajesh Sonwane

सचिन जाधव 
पुणे
: अंगणात खेळत असणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाच्या हातात बैलाला बांधलेली दोरी अडकली. याचवेळी बैल पळत सुटल्याने चिमुकला ओढत नेल्याने गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. सदरची घटना पुण्याच्या हवेली तालुक्यातील फुलगाव येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

हवेली तालुक्यातील फुलगाव येथील शौर्य शैलेश वागस्कर (वय ८) असे सदर घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव (Pune News) आहे. शौर्य हा अंगणात खेळत होता. खेळत असताना त्याने अंगणातील बैलाला बांधलेली दोरी हातात घेतली. हि दोरी मोठी होती. मात्र यावेळी बैल पळत सुटल्याने या दोरीचा शौर्यच्या गळ्याभोवती व अंगावर फास बसला. यामुळे तो बैलाच्या मागे दोरीमुळे ओढत गेल्याने त्याला जबर मार लागला.

एकुलता एक मुलगा गमावला

घटना घडली यावेळी त्याचे पालक घरात होते. आवाज आल्याने ते बाहेर आले. तेव्हा शौर्य गंभीर जखमी अवस्थेत दिसून आला. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला. मात्र त्यापूर्वीच त्याचा (Death) मृत्यू झाला. तो फुलगाव येथील शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. तर घरात तो एकुलता एक मुलगा होता. लोणीकंद पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT