PuneGaneshVisarjan Saam Tv
महाराष्ट्र

Pune News: नियोजन असूनही पुण्यातील गणेश मिरवणूक 32 तास रेंगाळली|VIDEO

Pune Ganesh Visarjan Procession: एकीकडे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब झालाय.. तर दुसरीकडे पुण्यातील विसर्जन मिरवणुकीने मागचे सर्व रेकॉर्ड मोडलेत.. यंदा मिरवणूक तब्बल 32 तास चालली... पुण्यातील मिरवणूक का रेंगाळली?

Omkar Sonawane

पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला यंदा विक्रमी वेळ लागला. संथ गतीने मिरवणूक चालल्याने बाप्पाच्या विसर्जनासाठी तब्बल 32 तास लागले. सरासरी 30 तासांचा विक्रम यंदा मोडीत निघाला. यंदा मिरवणूक कमी वेळेत करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न होते. मंडळांबरोबर बैठका झाल्या. मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक लवकर सुरु करण्यात आली.मात्र तरीही पुणे पोलिसांचे सुक्ष्म नियोजन फसलं आहे. पोलिसांनी मिरवणुकीसाठी योग्य नियोजन केल्याचा दावा केला होता, मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच दिसत होती. श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर नऊ वाजून 23 मिनिटांनी विसर्जन झाले. रात्री दोननंतर टिळक रोडवरील गर्दी ओसरली.

मात्र सकाळी सहा नंतर पुन्हा डिझेचा दणदणाट सुरू झाला. शनिवारी चार वाजून 45 मिनिटांनी मिरवणूक संपली. मेट्रोने मोठ्या संख्येने नागरीक आले होते. वाहनांची संख्याही जास्त असल्याने त्याचाही परीणाम मिरवणुकीवर झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मिरवणूक अत्यंत संथ गतीने पुढे सरकत असल्याने नागरिकही हैराण झाले होते. मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून नाच-गाणी आणि फटाक्यांची आतषबाजी होत होती. विशेषतः अलका टॉकीज चौकात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दीच्या ठिकाणी फटाके उडवल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. मंडळांच्या कार्यकर्त्यांना नियंत्रित करण्यात पोलिसांना अपयश आल्याचे चित्र होतं. पोलिसांनी प्रत्येक मंडळाला वेळेवर विसर्जन करण्याची विनंती केली मात्र मंडळांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. 1948 मध्ये विसर्जन मिरवणुकीला साडे सहा तास लागेल होते.त्यानंतर मिरवणुकीच्या तासात सतत्याने वाढ झाली आहे.

मात्र या विलंबामुळे सर्वसामान्य पुणेकरांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. वाहतूक कोंडी, सार्वजनिक व्यवस्थेवरील ताण आणि शांततेचा भंग यामुळे नागरिक त्रस्त झाले. पुणे पोलीस आणि गणपती मंडळांमध्ये समन्वयाचा अभाव दिसला. मंडळांकडून नियमांची पायमल्ली झाली त्यामुळे मिरवणूक रेंगाळली. यंदाच्या मिरवणुकीतील चुका टाळून पुढील वर्षी वेळेत मिरवणूक पार पाडेल, अशी आशा बाळगूया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT