Activist Trupti Desai demands immediate arrest of accused in Kalakendra firing case saam Tv
महाराष्ट्र

Daund Firing Case: दौंड गोळीबार प्रकरण; आमदाराच्या भावाला अटक करा; तृप्ती देसाईंची मागणी

Daund Kalakendra Shooting Row: गोळीबार करणाऱ्या आमदाराच्या भावाला त्वरीत अटक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलीय.

Bharat Jadhav

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुण्याचा दौंड तालुक्यातील चौफुला येथील एका कलाकेंद्रामध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा गोळीबार सत्ताधारी पक्षातील एका बड्या आमदाराच्या भावाने केला आहे, असा आरोप केला होता. एक्स पोस्ट शेअर करत रोहित पवार यांनी दौंड कलाकेंद्रातील गोळीबार प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आरोपींना अटक करावी अशी मागणी केलीय.

पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीधक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंडच्या वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाला. कलाकेंद्रात डान्स सुरु असताना अंदाधुंद गोळीबार झाला, पण यात कोणालाही काहीही झाले नाही, कुणी जखमी झाले नाही. कलाकेंद्र व्यवस्थापकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि अन्य एका आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कलाकेंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणावर तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या दौंड येथील कलाकेंद्रात गोळीबार केलेल्या भोर वेल्हा मुळशीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर आणि अन्य ३ आरोपींना ताबडतोब अटक करावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. महिलेवर गोळीबार करणे ही गंभीर बाब असून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये, असे सुद्धा तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

दरम्यान या गोळीबाराची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्टमार्फत दिली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी दौंडमधील गोळीबार घटनेची माहिती दिली होती. या गोळीबार प्रकरणात सत्ताधारी पक्षातील आमदाराचा भाऊ असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता.

गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल

गोळीबार प्रकरणी चार जणांच्या विरोधात यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कला केंद्र व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलीय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाबाहेर पत्ते खेळून आंदोलन

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे हेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतात; शरद पवार गटाच्या आमदाराचा दावा

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत? रवींद्र चव्हाण म्हणाले,राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो | VIDEO

Maharashtra Politics : नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार? बडा नेता भाजपच्या वाटेवर, पक्षांतरावर नेत्याचं मोठं वक्तव्य

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे ब्रिटीशकालीन धरण ९२ टक्के भरलं, पाणीचिंता मिटणार?

SCROLL FOR NEXT